West Bengal Elections: निवडणुका येतील तेव्हा ममता बॅनर्जी पक्षात एकट्याच राहतील : अमित शहा

एमपीसी न्यूज : बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा गड खालसा करण्यासाठी भाजपाने मास्टर प्लानच बनवल्याचे दिसत आहे. यासाठी अमित शाह हे दोन दिवसांच्या बंगाल दौऱ्यावर आहेत.

ममतांचे खास असलेले शुभेंदू अधिकारी यांना आपल्याकडे वळवण्यात भाजपला यश आले आहे. शुभेंदू अधिकारी यांनी दोन दिवसांपूर्वीच पक्ष आणि विधानसभेचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून ते भाजपमध्ये प्रवेश घेतील अशी शक्यता वर्तवली जात होती.

अखेर शनिवारी त्यांनी शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. याशिवाय खासदार सुनील मंडल आणि ९ आमदारही भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यापैकी पाच आमदार तृणमूल काँग्रेसचे आहेत. दरम्यान, शुभेंदूचा राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही.

 

जेव्हा विधानसभा निवडणुकांचे निकाल लागतील तेव्हा राज्यात भाजप २०० हून अधिक जागा जिंकत सत्ता स्थापन करेल. आज एक माजी खासदार आणि तृणमूल काँग्रेसमधील आमदार भाजपामध्ये आले आहेत. ही तर सुरूवात झाली आहे. निवडणुका येतील तेव्हा ममता बॅनर्जी तुम्ही पक्षात एकट्याच रहाल.’

सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि सीपीएमचे चांगले लोक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी पक्षात आले आहेत. ममता दीदी म्हणतात, भाजपा लोकांना पक्षांतर करायला लावते. मी दीदींना आठवण करून देऊ इच्छितो की, जेव्हा तुम्ही काँग्रेस सोडून तृणमूल पक्ष स्थापन केला, तेव्हा ते पक्षांतर नव्हते का?’ असा सवाल उपस्तिथ केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.