Vadgaon Maval : भाजपा महिला आघाडीकडून वेताळनगर ग्रामस्थांना अन्नधान्य किट व ब्लँकेटचे वाटप

एमपीसीन्यूज –  मावळ तालुका भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने डोंगरगाव वेताळनगर याठिकाणी पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा या माध्यमातून अन्नधान्य किट व ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या अध्यक्षा सायली बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी भाजपा मावळ तालुक्याच्या सभापती ज्योती शिंदे,भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, मावळ तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा सायली बोत्रे, संघटन मंत्री किरण राक्षे, सुमित्रा जाधव, रवि विधाटे, वैशाली ढोरे, प्रसिद्धीप्रमुख ज्योती काटकर, सीमा आहेर, आशा जाधव, किशोरी दळवी, पोलीस पाटील राजश्री कचरे, सरपंच सुनील येवले, बाळासाहेब नाणेकर, दिनेश जायगुडे, विजय कचरे, रघुनाथ जाधव, सुभाष कचरे, मदन नाणेकर, कमल नाणेकर, सुमन गाडे, मंगल कुटे, सीमा वाळुंज व डोंगरगाव ग्रामस्थ उपस्थित होते.

मागील पंधरवड्यात लोणावळा परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने डोंगरगाव जवळील वेताळनगर ही वस्ती पुर्ण पाण्याखाली गेली होती. तीन चार दिवस घरात पाणी राहिल्याने घरातील सर्व साहित्य व अन्नधान्यांची नासाडी झाली. येथील नागरिकांची समस्या समजल्यानंतर मावळ भाजपा महिला आघाडीच्या वतीने सदर मदत त्यांना सुपुर्द करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.