Lonavala : मळवंडी ठुले येथील भाजपच्या कार्यकर्त्यांचा सुनील शेळके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश 

एमपीसी न्यूज – मळवंडी ठुले गावातील भाजपच्या २५ कार्यकर्त्यांनी मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी व मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 

मळवंडी ठुले येथील नीलेश शिंदे, योगेश राक्षे, पप्पू बेनगुडे,भाऊ राक्षे, नीलेश राक्षे आणि शिवराज ग्रुपचे इतर 25 कार्यकर्ते यांचे शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले. त्यावेळी मळवंडी ठुले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मोहनशेठ बेनगुडे, शिवली सोसायटीचे चेअरमन भास्करराव आडकर उपस्थित होते.

गेली अनेक वर्षे तालुक्यात भाजपा सत्तेत असूनही तालुक्याचा विकास झाला नाही ग्रामीण भागाकडे कायम दुर्लक्ष केले. आता सुनील शेळके यांनी कसलीही अपेक्षा न ठेवता मावळ तालुक्यात विकास कामांचा तडाखा लावलाय आणि हा माणूस आमदार झाला तर मावळात विकासाची गंगा आणेल, असे मत भाजपामधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या युवकांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like