BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : युवकांच्या सुरक्षित भवितव्यासाठी युवा धोरण राबविण्याची भाजप युवा मोर्चाची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड ही औद्योगिक व कामगारांची नगरी आहे. आज हजारो तरुण या शहरात राहत आहेत. या तरुणांच्या भविष्यात महापालिकेने विचार करायला हवा. या युवकांच्या सुरक्षित भवितव्यांसाठी व त्यांच्या समस्यांवर त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे. याकरिता मनपाच्या वतीने एक चांगली दूरदृष्टी असणारे ‘युवा धोरण’ आणावे यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने महापौर राहुल जाधव यांना निवेदन देण्यात आले.

या ‘युवा धोरणात’ शिक्षण, क्रीडा, संस्कृती, रोजगार आदी क्षेत्रांचा विशेष अभ्यास करुन त्यांचा या ‘युवा धोरणात’ समावेश करून यातून शहरातील युवक व विद्यार्थ्यांना अनेक संधी मिळू शकतात अशा सूचना या निवेदनात करण्यात आल्या. शिवाय जर युवकांच्या सुरक्षित भवितव्यांसाठी ‘युवा धोरण’ आपल्या महापालिकेने आणले तर असे धोरण राबविणारी पिंपरी-चिंचवड मनपा ही देशातील पहिली महापालिका ठरली. याकडे महापौरांकडे लक्ष वेधण्यात आले. यावेळी महापौरांनी ‘युवा धोरण’ आणण्या संदर्भात योग्य ते आदेश देऊ, असे आश्वासन दिले.

याप्रसंगी नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे, भाजयुमोचे सरचिटणीस दीपक नागरगोजे, प्रभाग स्वीकृत सदस्य वैशाली खाडे, प्रविण सिंग, अमोल दामले, राहुल शिंदे, दीपक शर्मा, नागनाथ गुट्टे, मच्छिंद्र गिते, अक्षय निकम, अविनाश काळे, संदिप इंडे  आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3