-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune News : भाजपचा फरार माजी नगरसेवक विवेक यादवला गुजरातच्या सीमेवरून अटक

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज : कुख्यात गुंड बबलू गवळी याच्या खुनाचा कट रचल्याचा प्रकरणात फरार असलेली नगरसेवक विवेक यादव याला  अखेर पोलिसांनी जेरबंद केले. गुजरात राज्याच्या सीमेवर त्यांना पकडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणात पोलिसांनी दोघा शूटरला अटक केली होती. राजन जॉन राजमनी (वय 38, रा. भाग्योदयनगर, कोंढवा) व इब्राहिम उर्फ हुसेन याकुब शेख (वय 27, रा.वाकड) अशी त्यांची नावे आहेत. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. 

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

विवेक यादव हे भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील माजी नगरसेवक आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डतून ते भाजपच्या चिन्हावर निवडून आले होते. 2016 साली गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान यादव यांच्यावर गोळीबार झाला होता. सराईत गुंड बबलू गवळी यानेच हा गोळीबार केला होता.

कोरोना काळात बबलु गवळी तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर विवेक यादव याने दोघांना त्याच्या हत्येची सुपारी दिली होती. परंतु कोंढवा पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी दोन शार्प शूटरना अटक करीत खुनाचा कट उधळला होता. तर मुख्य आरोपी विवेक यादव हा फरार होता.

कोंढवा पोलीस मागील दोन दिवसांपासून विवेक यादवच्या मागावर होते. गुन्हे शाखा आणि पोलिसांची वेगवेगळी पथके त्याचा शोध घेत होती. दरम्यान पोलिसांना तो गुजरात राज्यात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने गुजरात सीमेवरून बुधवारी रात्री त्याला अटक केली. त्याला पुण्यात आणले जाणार आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

विवेक यादव आणि बबलू गवळी यांच्यात पूर्ववैमनस्य होते. याच रागातून बबलू गवळी यांनी 2016 साली गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान विवेक यादव यांच्यावर गोळीबार केला होता. याचाच बदला घेण्यासाठी विवेक यादव यांनी तुरुंगातून सुटलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना बबलू गवळीच्या खुनाची सुपारी दिली होती. त्याला कुठे व कशा पद्धतीने ठार मारायचे हे देखील ठरले होते. त्याबाबत कॉल आणि चॅटिंगद्वारे या दोघांचे बोलणे झाले होते. परंतु पोलिसांना या कटाची माहिती समजली आणि त्यांनी दोन आरोपींना पिस्तुलासह अटक केली होती.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.