Pune News : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदत करण्यासाठी भाजपचा पुढाकार : आमदार कांबळे

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी भाजपतर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी नागरिकांनीही काळजी घेण्याचे आवाहन पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी केले. 

पुणे शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (दि. 17 सप्टेंबर) सायंकाळी  कोविड- १९ मदत केंद्राचे व सेवा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. सोमवार पेठेत जनसंपर्क कार्यालयाजवळ स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

_MPC_DIR_MPU_II
आमदार सुनिल कांबळे यांच्या हस्ते या केंद्राचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी उद्धव मराठे, सामाजिक कार्यकर्ते विशाल दरेकर, दिलीप काळोखे, महेश पुंडे, सुखदेव अडागळे, पोपटराव गायकवाड,  प्रताप सावंत, छोटू वडके, संजय ओझा, मागीलाल शर्मा कॅन्टोन्मेंट बोर्ड मतदारसंघातील सर्व नगरसेवक, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

मागील 5 ते 6 महिन्यापासून पुणे शहरात अभूतपूर्व असे कोरोनाचे संकट निर्माण झाले आहे. या काळात नागरिकांना मदत करण्यासाठी भाजपचे स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर यांनी झोकून देऊन काम केले आहे.

15 हजार नागरिकांना रेशन वाटप, फवारणी करणे, आरोग्य सोयीसुविधा सक्षम करणे, कोरोनाच्या रुग्णांना बेडस उपलब्ध करून देणे, अशी अनेक महत्वपूर्ण कामे त्यांची सातत्याने सुरू आहेत. यातूनच मोठ्या प्रमाणात नागरिकांशी संपर्क आल्याने गणेश बिडकर यांना कोरोनाची लागण झाली.

त्यानंतरही बिडकर यांनी शांत न बसता नागरिकांना मदत करणे सुरूच ठेवले. आता ते या आजारातून बरे झाले आहेत. त्यांचे जनसेवेचे व्रत अखंडपणे सुरूच आहे. त्यांच्या या कार्याची आमदार सुनील कांबळे यांनी दाखल घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.