Pune : शिवाजीनगरमधून भाजपचे सिद्धार्थ शिरोळे 5 हजार मतांनी विजयी

एमपीसी न्यूज – शिवाजीनगरमधून भाजपचे सिद्धार्थ शिरोळे यांनी काँग्रेसच्या दत्ता बहिरट यांना कडवी लढत देऊन अखेर पाच हजार मतांची आघाडी मिळवत आपला विजय नोंदवला.

आज सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर काँग्रेसच्या दत्ता बहिरट यांनी खाते उघडत आघाडी घेतली होती. सुरुवातीच्या पाच ते सहा फे-यांमध्ये दत्ता बहिरट आघाडीवर होते. मात्र, त्यांना कडवी झुंज देत नंतरच्या फे-यांमध्ये भाजपच्या सिद्धार्थ शिरोळे यांनी आघाडी घेतली. ही आघाडी कायम ठेवत त्यांनी दत्ता बहिरट यांचा पाच हजार मतांनी विजय मिळवला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.