Goa Municipal Election : पणजीमध्ये भाजपची जोरदार आघाडी

एमपीसी न्यूज : गोव्याची राजधानी पणजी महानगरपालिकेसह , 17 ग्रामपंचायती, 6 नगरपालिकेसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीचा पहिला कल हाती आला आहे. त्यानुसार भाजप  पुरस्कृत गटाने जोरदार आघाडी घेतली आहे. भाजप 9 जागांवर आघाडीवर आहे. तर आम्ही पणजीकर गटाने 4 जागांवर आघाडी घेतली आहे.

कोरोनामुळे लांबलेल्या स्थानिक निवडणूक अखेर पार पडत आहे. गोव्यात महापालिका, 6 ग्रामपंचायती, नावेली जिल्हा पंचायत आणि सांखळी पालिकेच्या एका प्रभागासाठी मतमोजणी सुरू झाली आहे. मतमोजणीचा पहिला कल हाती आला आहे. भाजप 9 जागांवर आघाडीवर आहे. तर आम्ही पणजीकर गटाने 4 जागांवर आघाडी घेतली आहे. आम्ही पणजीकर गटाला काँग्रेस पुरस्कृत असल्याचे सांगितले जात आहे.

पणजी महानगरपालिकेसह 6 नगरपालिकांचे आज मतमोजणी होत आहे. यात डिचोली, पेडणे, वाळपई, कुडचडे, कानकोन आणि कुंकळी या नगरपालिकांचा समावेश आहे. याबरोबरच नावेली जिल्हा पंचायतीच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत असून ग्रामपंचायतींच्या अठरा जागांसाठी पोट निवडणूकींची मतमोजणी आज होत आहे. साडेआठ वाजता मतमोजणी ला सुरुवात होत असून 11 वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहेत. तसंच, पणजी महानगरपालिका आणि सहा नगरपालिकांच्या 421 जागांसाठी ही मतमोजणी होत आहे. एकूण 423 उमेदवारांच्या भविष्याचा आज फैसला होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.