Pune : स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपतर्फे हेमंत रासने तर, महाविकास आघाडीतर्फे महेंद्र पठारे यांचा अर्ज

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपतर्फे हेमंत रासने यांनी तर, राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेना महाविकास आघाडीतर्फे महेंद्र पठारे यांनी सोमवारी अर्ज दाखल केला. या पदासाठी येत्या 6 मार्चला निवडणूक होणार आहे.

महेंद्र पठारे यांचा अर्ज दाखल करतेवेळी विरोधी पक्षनेते दीपाली धुमाळ, माजी महापौर प्रशांत जगताप, नगरसेविका अमृता बाबर, नगरसेवक अशोक कांबळे, पुणे शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ उपस्थित होते. तर, हेमंत रासने यांचा अर्ज दाखल करतेवेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे, नगरसेवक राजाभाऊ बराटे, दीपक पोटे, राजेंद्र शिळीमकर, राजेश येणपुरे, जयंत भावे उपस्थित होते. या दोघांनीही नगरसचिव सुनील पारखी यांच्याकडे अर्ज दाखल केले.

‘पीएमपीएल’च्या नयना गुंडे ह्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. स्थायी समितीत एकूण 16 सदस्य आहेत. त्यामध्ये भाजपचे 10, राष्ट्रवादी 4 तर, शिवसेना आणि काँगेसचा प्रत्येकी 1 सदस्य आहे. त्यामुळे भाजपचा अध्यक्ष निश्चित मानला जात आहे. अध्यक्षपदासाठी पुन्हा हेमंत रासने यांनाच संधी मिळाली आहे. पुढील अर्थसंकल्प तेच सादर करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.