Pune News : भाजपच्या विनायक आंबेकरांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण

शरद पवारांवर फेसबूकवर केली आक्षेपार्ह पोस्ट

एमपीसी न्यूज : शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणारे पुणे शहरातील भाजपचे पदाधिकारी विनायक आंबेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. ही घटना 14 मे रोजी दुपारी घडली. दोन दिवसांआधी फेसबुकवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांवर आंबेकर यांनी पोस्ट केली होती. या वादग्रस्त पोस्टमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून आंबेकर यांना मारहाण झाली.

अभिनेत्री केतकी चितळेने शरद पवारांवर फेसबूकवर पोस्ट केली होती. या पोस्ट नंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच हि दुसरी घटना पुण्यात घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंबेकर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना मारहाण केली आहे. विनायक आंबेकर यांच्या विरोधात दोन दिवसआधीच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली होती. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर अवमानकारक पोस्ट केल्याने ही मारहाण करण्यात आल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.

आंबेकर यांना मारहाण केल्यानंतर याबाबत पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात अली आहे. याप्रकरणी पोस्ट केलेली कविता काढून टाकली होती, यामध्ये कोणत्याही नेत्याचे नाव न्हवते, तरीही याप्रकरणी मी माफी मागितली होती. असे स्पष्टीकरण भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांनी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.