Black Fungus : देशात ‘म्युकरमायकोसीस’चे 8,848 रुग्ण, महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक

एमपीसी न्यूज – देशात ‘म्युकरमायकोसीस’चा (काळी बुरशी) धोका वाढत आहे. देशात सध्या 8 हजार 848 ‘म्युकरमायकोसीस’चे रुग्ण असून, महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक व हरियाणा या राज्यांत सर्वाधिक रुग्ण आहेत.

देशात सध्या कोरोना संसर्गाचा वेग काहीसा मंदावत असताना ‘म्युकरमायकोसीस’चे नवे संकट समोर आले आहे. देशात 8 हजार 848 ‘म्युकरमायकोसीस’चे रुग्ण आहेत. त्यापैकी गुजरातमध्ये 2,282, महाराष्ट्रात 2,000, आंध्रप्रदेशमध्ये 910 तर, राजस्थान व मध्य प्रदेश राज्यात प्रत्येकी 700 रुग्ण आहेत.

म्युकरमायकोसीस’चा अंतर्भाव महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत करण्यात आला असून त्यासाठी आवश्यक 30 कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सांगितले आहे. राज्यात म्युकरमायकोसीस’चे रुग्ण वाढत असल्याने इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यात सांगितले होते.

दरम्यान, विविध राज्यांमध्ये म्युकरमायकोसिसच्या वाढत्या रुग्णसंख्येचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर अ‍ॅम्फोटेरिसिन बी औषधाच्या एकूण 23 हजार 680 अतिरिक्त कुप्या आज सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना वितरित करण्यात आल्या आहेत, असे केंद्रीय रसायन व खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी जाहीर केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.