Pune – शिवाजीनगर येथील पाटील इस्टेटमध्ये नागरिकांना ब्लँकेट वाटप

एमपीसी न्यूज – शिवाजीनगर येथील पाटील इस्टेटमध्ये झालेल्या जळीतकांडामधील पीडित नागरिकांना सृजन क्रिकेट स्पर्धेतील सहभागी खेळाडूंच्या हस्ते ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहितदादा पवार यांनी सुरू केलल्या सृजन या सामिजिक बांधीलकी जपणाऱ्या उपक्रमाअंतर्गत गुरुवारी तातडीने हे ब्लँकेट वाटप करण्यात आले. येथील पीडित कुटुंबांना प्रशासकीय स्तरावर तसेच विविध संस्थांमार्फत मदत मिळवून देण्यासाठी रोहित पवार यांनी पुढाकार घेतला आहे.

बुधवारी (दि. 28 नोव्हेंबर रोजी) दुपारी लागलेल्या भीषण आगीत पाटील इस्टेट येथील सुमारे 200 ते 250 झोपड्या पूर्णपणे भस्मसात झाल्या आहेत… शेकडो कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत… या कुटुंबानी जमवलेली सर्व पुंजी, कपडे, घरातील मौल्यवान साहित्याची जळून राख झाली आहे. अंगावरील कपड्यासहीत लोक घरातून बाहेर पडले.. त्यामुळे जीवितहानी झाली नसली तरी मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. जळालेले पत्रे, घरातील साहित्याचे ढिगारे यांचेच साम्राज्य पसरले आहे.

या मदतकार्यामध्ये अॅड. निलेश निकम, बाळासाहेब बोडके, मा. नगरसेवक राजाभाऊ साने, नगरसेवक उदय महाले, किशोर कांबळे, पीडीसीएचे चेअरमन यशवंत भुजबळ, मयूर पवार, नरेश ढोमे, अॅड. निखिल मालानी तसेच सृजन क्रिकेट करंडक स्पर्धेत खेळणारे क्रिकेटपटूही सहभागी झाले.

जळितानंतर पाटील इस्टेट भागातील परिस्थिती अत्यंत भीषण बनल्याचे दिसत आहे. या कुंटुंबांना आधाराची गरज आहे. याच बांधिलकीच्या जाणिवेतून वंचितांना आधार देण्याचे काम सृजन करीत आहे. आज तातडीची गरज म्हणून ब्लॅंकेटचे वाटप केले आहे. ही मदत तातडीची आहे. या कुटुंबांना प्रशासकीय स्तरावर तसेच विविध संस्थांमार्फत मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे सृजनचे संस्थापक व जिल्हा परिषद सदस्य रोहितदादा पवार यांनी सांगितले.

यापूर्वी नाशिक येथील गरजू नागरिकांना आरोग्यसेवेच्या माध्यमातून मदत, तसेच पुण्यातील ससून रुग्णालयात सक्शन पंप देण्यासोबतच अनेक सामाजिक उपक्रम सृजनच्या माध्यमातून राबवण्यात येतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.