Blog by Harshal Alpe : कुठे जातोयस, हिंदी चित्रपटसृष्टीत? नको जाऊस, फार वाईट आणि चरसी लोक असतात तिथे…

0

एमपीसी न्यूज : आपल्याकडे बॉलीवूड अर्थात हिंदी चित्रपटांचे इतके रसिक प्रेक्षक असतानाही सध्या सगळेच जण बॉलीवूडबाबत नाराजी व्यक्त करत आहेत, त्यासाठी तितकीच ठोस कारणंही आहेतच… त्यामुळे सध्याचं बॉलीवूडमध्ये झालेलं दूषित वातावरण लवकरच दूर व्हावं अशी सगळ्यांची अपेक्षा आहे, याच विषयावरील हर्षल अल्पे यांचा ब्लॉग आम्ही सादर करीत आहोत.
…………………..

सकाळी सकाळी एका काकांचा मला दिलेला अनाहूत सल्ला सकाळी सकाळी मला येऊन टोचला नंतर त्या काकांनी मला कंगना रनाउट (त्यांचा उच्चार, माझा नाही) यांचे ट्विट केलेले विचार वाचायला दिले, 99% चित्रपटसृष्टी ही ड्रगिस्ट आहे हे वाचल्यावर मागे एकदा माझ्या भावाने विवेकानंद यांचे पुस्तक वाचून जे मत व्यक्त केले होते की, “मग मी का राहतोय या वासनेच्या दुनियेत आणि अहमपणाच्या जंजाळात हे जीवन मिथ्या आहे” हे मत व्यक्त झाल्यावर माझ्या काकुने लगेच ते पुस्तक त्याला सापडणार नाही अश्या पद्धतीने कपाटात लपवून ठेवले होते… अहो! हे काय वय आहे का? 18/19 व्या वर्षी शिक्षण वैगेरे सगळं सोडून संन्यास घ्यायला लागलं होत पोरगं, अवघड होत हो!

तसेच मला ही या देवी कंगना यांचे ते पवित्र विचार वाचून झालं होत. वास्तविक आजवर हा देह हिंदी चित्रपटांवरच पोसलेला यातील प्रत्येक मोठ्या कलाकारावर केलेलं विलक्षण प्रेम आठवत होत तिसर्‍या वर्षीपासून ते आता 34 व्या वर्षापर्यंतचा सगळा चित्रप्रवास खाडकन डोळ्यासमोर तरळला आणि सगळे ड्रगिस्ट आहेत या वास्तवाने डोळ्यासमोर काजवेच चमकले… की, शी, किती हे खोट जग? आम्ही याला खर्‍याची दुनिया समजायचो, ही तर खोटयांची जागा निघाली, अस वाटलं की एका नयनरम्य स्वप्नातून खाडकन जागा झालो आणि समोर भिंतीवर एक भेग दिसली …

खरं तर कंगना राणावत काही खोट बोलत असेल अस ही नाही तिला तो अनुभव आला ही असेल, पण! आमच्यासारख्या राजकारण विरहित, कशाची ही तमा न बाळगता हिंदी चित्रपटसृष्टीवर प्रेम करणार्‍यांचे काय??? वास्तवाचा हा पडदा हा असा येईल हे अपेक्षितच नव्हतं हो! आता कळते आहे की, अनेक आम्ही डोक्यावर घेतलेल्या चित्रपटांमध्ये सुद्धा देशविरोधी अस काही होत… एक तर सध्या चित्रपटसृष्टीच चालू नाहीये, या कोरोनाच्या संकटामुळे म्हणजे चित्रीकरण होत असतील, ओ.टी .पी  वर प्रदर्शित ही होत असतील तरी, पण मोठ्या पडद्यावर शिट्ट्या मारत चित्रपट बघायची मजा काही औरच….

अश्यातच हे अस काही जर टिव्हीवर सतत चालू असेल तर टिव्ही बघण्याचा नाद करवत नाही, त्यात भर lockdown मध्ये आमचा लाडका कलाकार सुशांतसिंग राजपूत गेला हो, फार दुःख झालं हो! धोनी चित्रपटानंतर आम्ही धोनीलाच सुशांत समजायला लागलो होतो आणि सुशांतलाच धोनी, हे त्याच महात्म्य होत… छिचोरे मधले त्याचे जगण्याचे इतिकर्तव्य सांगणारे वक्तव्य तर काळजाला भिडलं हो! दिल बेचारा चित्रपट मोबाईलवर पाहताना मजा नाही आली कारण, एकतर ती सवय नाही आणि सुशांत ही नाही, आज ही कल्पनाच सहन होत नाही.

त्यात त्याच्या मृत्यूच्या तपासांच्या बातम्यांचा आणि विश्लेषणांचा झालेला खेळखंडोबा तो आरडा-ओरडा, आई गं ! म्हणजे या सगळ्यात त्याचं सुद्धा चारित्र्यहनन होतंय हे भानच नाही. शेवटी माझ्या सारख्यांना असं वाटत की, जे काही तपासकाम करायचे असेल ते न ओरडता करा, फक्त न्याय मिळवून द्या बाबा आम्हाला आणि त्याला सुद्धा….

शेवटी इतकंच, काहीही करा, कोरोनाचं ते घालवा, त्या बच्चन, क्रिश आणि असंख्य सुपरहिरोजला सांगा आता या आणि काय ती फाइट करा आणि घालवा आणि ते चुलबुल पांडे वैगेरे सारख्या सुपरकौपनी लवकरात लवकर तपास लावा सुशांत प्रकरणाचा.. आणि न्याय द्या बाबा … आणि ती थिएटर चालू करा बाबा, भले त्या फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करून आम्ही तयार आहोत, नवीन चित्रपटाची मी आणि माझी शिट्टी वाट बघत आहे… जमलं तर करा विचार….

– हर्षल आल्पे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.