Blog: कोरोनामुक्तीसाठी आताच काळजी घ्या, नाही तर गुन्हेगारीचाही उद्रेक होईल!

Blog by Mohan Deshpande, Chinchwad: Take care now to control Corona, otherwise there will be an outbreak of crime too!

लॉकडाउनला 50 पेक्षा जास्त दिवस झाले आहेत.

आता थोड्या वेळापूर्वी चिंचवड आनंदनगरमधील उच्चांकी रुग्ण संख्या बातमी वाचली तसेच साम मराठी चॅनेलवर बातमी पाहिली की, पुण्यात रात्रीतून 12 तासात 65 नवे कोरोना रुग्ण… प्रमाण वाढतेच आहे आणि लॉकडाउन एक्सटेंड होतच आहे…अनेकांचे अनेक प्रश्न आहेत, परंतु अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण होत चालली आहे.

पुढील काही दिवसात अशीच स्थिती संपूर्ण पिंपरी चिंचवड परिसरातही उद्भवण्याची शक्यता टाळता येणार नाही. कारण अक्षय्यतृतीयेच्या आदल्या दिवशी मी बाजारपेठेत आंबे मिळतात का बघण्यासाठी गेलो होतो, त्यानंतर कालच (17 मे) मी घराबाहेर पडलो. काल सकाळी मी स्वतः पूजेचे काही सामान व इतर वस्तू, आंबे आणायला चिंचवड गाव येथील बाजारपेठेत गेलो असता, तिथली गर्दी पाहून मी एकदम हैराण झालो.

प्रशासनाने पालन करण्यास सांगितलेल्या नियमांचे, (सोशल डिस्टन्सिंगचे, तोंडावर मास्क घालण्याबाबतचे) लोकांनी तीन तेरा वाजवलेल्याचे निदर्शनास आले. त्याचप्रमाणे ऐकण्यात आल्यानुसार पिंपरीतील बाजारपेठेत सुध्दा हीच परिस्थिती आहे. सुशिक्षित लोकच नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून आले. लोक अजूनही कोरोना या महामारीला सिरियसली घेत नाही आहेत.

ज्यांचाकडे पैसे आहेत, त्यांचे ठीक चालले आहे, परंतु इतरांचे हातावर पोट असणाऱ्यांचे काय… असा प्रश्न उद्भवत आहे. ज्यांनी प्रशासनाने आवाहन केल्यानुसार कायदा व नियमांचे पालन करुन घरात थांबले, त्यांची मेहनत वाया जाणार नाही का?

अजूनही वेळ गेलेली नाहीये… प्रशासनाने अतिशय कठोर निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे… अन्यथा लॉकडाऊन 5.0… 6.0…. 7.0… चालतच राहील… याचे परिणाम पुढील काळात गुन्हेगारी वाढण्याची शक्यता टाळता येणार नाही…  एव्हढेच मला सांगायचे आहे.

– मोहन देशपांडे, चिंचवड

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.