Pune News : संत निरंकारी मिशनच्या शिबिरात 228 पिशव्यांचे रक्त संकलन

एमपीसी न्यूज : संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन वारजे-कोथरूड शाखेच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 228 पिशव्या रक्त संकलित करण्यात आले. रविवारी (दि. ३) हे रक्तदान शिबीर झाले.

या शिबिराचे उदघाटन ताराचंद करमचंदानी यांनी केले. ससून रुग्णालयाच्या रक्तपेढीने रक्त संकलित केले. शिबिरासाठी रक्तदात्यांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला.

_MPC_DIR_MPU_II

सदगुरू बाबा गुरुबचन सिंह महाराज यांनी सत्य, प्रेम, शांती, मानव एकता प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष करताना आपल्या प्राणांची आहुती दिली. बाबा हरदेव सिंह महाराज यांनी सर्व अनुयायांना उपदेश केला आहे की, बलिदानाचा बदला घ्यायचा असेल तर माणसाचे रक्त नाल्यामध्ये नाही तर नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे. तेंव्हापासून संपूर्ण विश्वामध्ये फाउंडेशनच्या माध्यमातून रक्तदान शिबीराचे आयोजन करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येते.

कोथरूड शाखेचे प्रमुख वरघडे आणि वारजे शाखेचे प्रमुख विजय कदम यांनी सर्व रक्तदात्यांचे आणि अनुयायांचे आभार मानले. शिबिरात सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1