Blood Donor Day : आज ‘जागतिक रक्तदाता दिन’, रक्तदान आणि मानवी रक्ताबद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? 

Blood Donor Day: Today is World Blood Donor Day, do you know these things about blood donation and human blood?

एमपीसी न्यूज – रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजलं जाते. शास्त्राप्रमाणे जीवनदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. सामान्य व्यक्तीही रक्तदान करून दुसर्‍याचा जीव वाचवू शकते. आज संपूर्ण जगभरात ‘जागतिक रक्तदाता दिन’ साजरा होत आहे. रक्तदात्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी 2004 पासून जागतिक आरोग्य संघटना 14 जून रोजी ‘जागतिक रक्तदाता दिवस’ साजरा करत असते.

का साजरा केला जातो?

A-B-O या रक्तगटांचा शोध लावणारे आणि रक्तदान संकल्पनेला अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडणारे ऑस्ट्रियाचे नोबेल विजेते डॉ. कार्ल लॅन्डस्टेनर यांच्या जन्मदिनानिमित्त ‘जागतिक रक्तदान दिन’ साजरा केला जातो.

यंदाच्या वर्षाची थीम आणि घोषवाक्य

 ‘सुरक्षि‍त रक्त, जीव वाचवते’ अशी या वर्षीच्या जागतिक रक्तदाता दिनाची थीम असून ‘रक्त द्या आणि जगाला एक आरोग्यदायी स्थान बनवा’ हे यावर्षीचं घोषवाक्य आहे.

रक्तदान कोण करू शकते, काय आहेत आवश्यक अटी?

  • कोणतीही सुदृढ, सशक्त, रोग न झालेली व्यक्ती रक्तदान करू शकतो.
  • वयाच्या 18 व्या वर्षापासून 60 व्या वर्षापर्यंत रक्तदान करता येते. 
  • रक्तदानानंतर कोणतेही कष्टाचे काम करू शकतो. 
  • रक्तदान करण्यासाठी रक्तदात्याचे वजन 45 किलो हुन अधिक असावे. 
  • रक्तदाताच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण 12.5 असावे. 
  • रक्तदाताच्या नाडीचे ठोके 80 ते 100 असावेत.
  • गर्भवती स्त्रिया आणि स्तनदा स्त्रिया रक्तदान करू शकत नाहीत.

मानवी रक्ताबद्दल काही रंजक गोष्टी

नुकत्याच जन्मलेल्या बालकामध्ये फक्त एक कप (जवळपास 250 ML) रक्त असते आणि तरुण माणसामध्ये जवळपास पाच लिटर रक्त असू शकते, म्हणजेच शरीराच्या एकूण वजनाच्या सात टक्के रक्त असते.

प्लाझ्मा हे शरीरात प्रोटीन तयार करते आणि रक्ताला गोठण्यापासून वाचवते तर प्लेटलेट्स हे रक्ताला गोठ्ण्यास मदत करते, यांच्यामुळेच जखम झाल्यानंतर काही वेळ रक्त आल्यानंतर रक्त येण्याचे बंद होते.

1 ML रक्तामध्ये 10,000 पांढऱ्या रक्तपेशी आणि2,50,000  प्लेटलेट्स असतात.

लाल रक्त पेशी ह्या ऑक्सिजनला घेऊन जात असतात आणि कार्बनडायऑक्साईड (CO2) संपवतात. पांढऱ्या रक्त पेशी ह्या शरीराला बॅक्टेरीया आणि वायरस यांच्यापासून वाचवतात त्यांना सैनिक पेशी सुद्धा म्हणतात.

आपल्या नसांमध्ये 400 किलोमीटर प्रतितास या वेगाने रक्ताभिसरण होते. जर आपल्या शरीराने रक्ताला बाहेर पंप केले, तर हे रक्त 30 मीटरपर्यंत उडू शकते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.