Pune : महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य विभागामार्फत शुक्रवारी ( दि. १४) सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत पुणे मनपा भवन दुसरा मजला जुनी इमारत येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे.

त्यासाठी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि. 15) निमंत्रितांसाठी चहापणाचा कार्यक्रम ठेवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like