जागतिक योगा दिनानिमित्त रक्तदान शिबिर

Blood donation camp on the occasion of World Yoga Day 350 हून अधिक नागरिकांना तपासून औषधोपचार करण्यात आले. यावेळी 35 युवकांनी रक्तदान केले.

एमपीसी न्यूज- श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट यांच्यावतीने जागतिक योगा दिनानिमित्त केतकवळे, कुंभशी (ता. पुरंदर) या गावांमध्ये रक्तदान, मोफत वैद्यकीय आणि औषधोपचार शिबिर पार पडले. यावेळी 350 हून अधिक नागरिकांना तपासून औषधोपचार करण्यात आले. यावेळी 35 युवकांनी रक्तदान केले.

नागरिकांना मोफत मास्क, सॅनिटायझर पल्स आयुर्वेद सुपरस्पेशलिटी क्लीनिक यांचा रोगप्रतिकारक शक्ती वर्धक काढा देण्यात आला. डॉ. आनंद चव्हाण यांनी नागरिकांची आरोग्य तपासणी करून ऐश्वर्या जगताप, प्रशांत उंदरे, आनंद लोंढे, सागर मोकाशी पुणे ब्लड बँक यांनी सहकार्य केले.

पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी दूरध्वनी करून उपक्रमाचे कौतुक केले. या कार्याबद्दल ट्रस्टला शुभेच्छा दिल्या. पदवीधर मतदार संघाच्या नोंदणीचे अर्जही भरून घेण्यात आले.

प्राचार्य डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी या आजाराविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करून स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंग याचे महत्व समजावून सांगितले. पल्स आयुर्वेद सुपरस्पेशालिटी काढ्याचे महत्व व तो नियमित घेण्याचे आवाहन डॉक्टर आनंद चव्हाण यांनी केले.

दरम्यान, कोरोनाच्या संकट काळात श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टतर्फे हजारो नागरिकांना अन्नदान करण्यात आले आहे. तब्बल 57 हजार 500 नागरिकांना जेवण वाटप करण्यात आले आहे. 11 रक्तदान शिबिर, 22 मोफत वैद्यकीय कॅम्प, कोरोना किट वाटप, 23 वैद्यकीय शिबीर आतापर्यंत घेतले आहे.

कोरोना झाला म्हणून घाबरण्याचे कारण नाही. वेळीच उपचार आणि काळजी घेतल्यास हा रोग सुध्दा बरा होऊ शकतो, असे डॉ. राजेंद्र खेडेकर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like