Akurdi : बीजेएस व माहेश्वरी युवा संगठन च्या वतीने आकुर्डी येथे रविवारी रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज – राज्यात रक्ताचा मर्यादित साठा आहे आणि नागरिकांनी रक्तदान करून सहकार्य करावे या आरोग्य मंत्री व मुख्यमंत्री यांच्या आवाहनाला सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय जैन संघटना आणि माहेश्वरी युवा संगठन यांच्या वतीने आकुर्डी येथे रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आकुर्डी स्थानकात आयोजित केलेल्या हे शिबिर रविवार दि.28 आणि सोमवार दि.29 सकाळी 5 ते सायंकाळी 5 वा. पर्यंत सुरू राहणार आहे. या रक्तदान शिबिरासाठी  पोलीसांची परवानगी घेतली आहे. रक्तदान करणारांची यादी तयार केली जाणार असून

एका वेळी ४-५ लोकांना अर्ध्या-अर्ध्या तासांच्या कालवधीत लोकांची गर्दी न करता हे शिबिर पार पडले जाणार आहे.
रक्तदान करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपली नाव नोंदणी अजय लढ्ढा  9960178178/  सागर सारडा 9822645887 / भगवान पल्लोड 9923756250 / सुशील सारडा 9689903745 यांना संपर्क साधून करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.