Vadgaon Maval : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वडगाव मावळ येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 198 रक्तदात्यांनचा सहभाग. राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्ताचा तुटवडा भासत आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार आमदार सुनील शेळके व तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या नेतृत्वाखाली वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात रक्तदान आयोजित केले होते. 

 शिबिराचे उदघाटन तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, तालुका ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बाबूराव (आप्पा) वायकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य  विठ्ठलराव शिंदे, गणेशअप्पा ढोरे, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी नगरसेवक गणेश खांडगे, गणेश काकडे, सुनील ढोरे, चंद्रजीत वाघमारे, राजेंद्र कुडे, राजेश बाफना, सुनील दाभाडे, काळुराम मालपोटे, नामदेव दाभाडे, अंकुश आंबेकर, नामदेव शेलार, कृष्णा दाभोळे, तानाजी दाभाडे, विष्णू गायखे, अनिल मालपोटे,नारायण ठाकर, मनीष झेंडे, कैलास गायकवाड, महिलाध्यक्षा सुवर्णा राऊत, रुपाली दाभाडे, उमा शेळके, शितल हगवणे, हेमा रेड्डी,सविता मंचरे, किशोर गाथाडे, दत्तात्रय माळी, आशिष खांडगे, विठ्ठल जाधव, कैलास खांडभोर, विक्रम कलवडे, गणेश कोळी, प्रकाश हगवणे, संतोष खैरे, राजेश राऊत, संतोष राऊत, सुरेश कडू, सोमनाथ पवळे, धनंजय कोद्रे, सचिन कुंभार, अभिजीत काळोखे, विकास कंद, शंकर स्वामी, शेखर कटके, सुहास शेवकरी व सर्व पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.

रक्तदात्यास आमदार सुनिल शेळके यांच्या वतीने टी शर्ट, मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.   गरवारे रक्त संकलन केंद्र, तळेगाव दाभाडे व पिंपरी सेरोलोजिकल ब्लड इन्स्टिटयूट यांचे रक्तदान शिबिरास सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे नियोजन मावळ ओबीसी सेल अध्यक्ष अतुल राऊत, प्रभारी मंगेश खैरे, उपाध्यक्ष सोमनाथ धोंगडे, मावळ अल्पसंख्यांक अध्यक्ष आफताब सय्यद,, महेश तुमकर, अमोल सुतार, अवधूत गायकवाड, राहील तांबोळी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल राऊत व आभार सुभाष जाधव यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.