Blood donation : स्माईल व्यसनमुक्ती केंद्र आणि रोटरी क्लब तळेगाव सिटी मार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज : स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक अध्यक्ष हर्षल पंडीत यांच्या वाढदिवसाच्या निम्मित स्माईल व्यसनमुक्ती केंद्र  रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.23 रोजी रक्तदान शिबिराचे  आयोजन करण्यात आले होते.(Blood donation) सदर शिबिरास पुणे येथील ओम ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले. या शिबिरात 80 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

उपस्थित वक्त्यांनी रक्तदानाचे फायदे व महत्व पटवून दिले त्याचबरोबर व्यसनमुक्ती विषयावर उपयुक्त आणि बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. सदर शिबिरामध्ये रोटरी क्लब तळेगाव सिटी चे अध्यक्ष दीपक फल्ले, सुनीलशेंडे, सह प्रक्लप प्रमुख किरण ओसवाल,विलास काळोखे, दिलीप पारेख, संजय मेहता,(Blood donation) भगवान शिंदे, मिलिंद निकम, मधुरा निकम, विश्वनाथ निकम,प्रभुनाथ कश्यप, तानाजी मराठे,पराग पाटील,ब्लड डोनेशन असोशिएशन चे अध्यक्ष प्रमोद शिवतारे, तसेच स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचे नीरज शेवडे, राहुल बोरुडे, नितीन नाटेकर, अनिल सावंत,अजिंक्य देशपांडे, रोहन यादव, हर्षल जोशी, राहुल केळकर, आनंद भागवत, मुरली कट्टा, शनीतेज बिरारी, अमर कुंभार, प्रणव देशमुख, तसेच आदी कर्मचारी उपस्थित होते.

Talegaon-Dabhade : एनएमआयईटी मध्ये कॅड सॉफ्टवेअर स्किल स्पर्धा उत्साहात

सदर रक्तदानात सहभागी प्रत्येक रक्तदात्यास स्माईल व्यसनमुक्ती केंद्रातर्फे भेटवस्तू देण्यात आली. स्माईल केंद्र अध्यक्ष हर्षल पंडित व रोटरी क्लब अध्यक्ष दीपक फल्ले यांनी मनोगत व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.