Pune News : सुरेंद्र पठारे फाऊंडेशनतर्फे आयोजित शिबिरात 1644 जणांचे रक्तदान

एमपीसी न्यूज : सुरेंद्र पठारे फाऊंडेशनतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात 1,644 बाटल्या रक्ताचे संकलन झाले. काल सकाळी 8 ते 4 यावेळेत खराडी गावातील राजाराम भिकू पठारे इनडोअर स्टेडियममध्ये हे शिबिर पार पडले. ससून सर्वोपचार रुग्णालय रक्तपेढी, रेडप्लस रक्तपेढी व आधार रक्तपेढी यांच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य तपासणी करूनच पात्र दात्यांना रक्तदानासाठी सोडण्यात येत होते. यावेळेस फाऊंडेशनने प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र व अल्पोपहार देऊन त्यांचे आभार मानले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे. हीच बाब लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांना हातभार लावावा, या विचारातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान करून प्रजासत्तक दिनी राष्ट्राला अभिवादन करावे, ही भावनाही त्यामागे होती.

या आवाहनाला तरुणांनी, नागरिकांनी अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद दिला याचा आनंद वाटतो. खराडीव्यतिरीक्त अन्य भागांतील लोकही मोठ्या संख्येने यांत सहभागी झाले. भविष्यातही फाऊंडेशनतर्फे समाजोपयोगी उपक्रम राबवले जातील, असे सुरेंद्र पठारे यांनी सांगितले.

सोशल डिस्टंसिंग व इतर नियमांचे पालन करूनच हे शिबीर पार पडले. फाउंडेशनच्या सर्व स्वयंसेवकांनी व मित्र परिवाराने हे शिबीर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.