Talegaon dabhade: विरोधी पक्षनेते गणेश काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या रक्तदान शिबीर

Blood donation camp tomorrow on the occasion of Opposition Leader Ganesh Kakade's birthday: जास्तीत-जास्त नागरिकांनी रक्तदान करावे

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगांव एमआयडीसी, मावळ नागरी सहकारी पतसंस्था आणि मेथॉडिस्ट चर्च सेंटेनरी तळेगांव स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या (रविवारी) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबतची माहिती रोटरी क्लब ऑफ तळेगांव एमआयडीसीचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांनी दिली.

गरवारे ब्लड बँक तळेगांव जनरल हॉस्पिटल येथे रविवारी सकाळी 9  ते दुपारी 12 या वेळेत शिबिर पार पडणार आहे. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठीच्या सर्व प्रकारच्या नियमांचे पालन करून शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्ताची कमतरता भासत आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत प्रत्येकाने रक्तदान करणे काळाची गरज निर्माण झाली आहे.

जास्तीत-जास्त नागरिकांनी शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

रोटरी क्लब ऑफ तळेगांव एमआयडीसीच्या अध्यक्षा रजनीगंधा खांडगे, सचिव सचिन कोळवनकर, उपाध्यक्ष विल्सनेट सालेर, प्रकल्प प्रमुख रुत सालेर, मावळ नागरी सहकारी पतसंस्थेचे कार्याध्यक्ष सुनील भोंगाडे, सचिव विलास टकले, खजिनदार सुदाम दाभाडे, प्रकल्प प्रमुख हनुमंत शिंदे यावेळी उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, रोटरी क्लब ऑफ तळेगांव एमआयडीसीचे माजी अध्यक्ष, विरोधी पक्षनेते गणेश काकडे यांचा उद्या वाढदिवस आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा काकडे अतिशय साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.