Nigdi : रक्तदान शिबिरात ६५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या 36 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या ३६ व्या वर्धापनदिन निमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात आज ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. निगडी येथे सावरकर सदन, सेक्टर क्रमांक २५ मध्ये आयोजित केलेल्या या १९ व्या शिबिरात महिला रक्तदात्यांची संख्या उल्लेखनीय होती. या शिबिरात विनोद बन्सल, सदाशिव रिकामे, अनिल खैरे, प्रदीप पाटील, दत्तात्रय जोशी आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.  
यावेळी भास्कर रिकामे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले, “उन्हाळ्यामध्ये  सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा असतो यासाठी हेतुपुरस्सर दरवर्षी मे महिन्यात मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले जाते, त्यास प्रतिसाद उत्तम मिळतो”

सातत्याने शिबिर आयोजित केल्याने व आहाराविषयी मार्गदर्शन करीत असल्याने नागरिकांमध्ये विशेषतः महिलांमध्ये आहाराविषयी जागृती होत आहे. त्यामुळे हिमोग्लोबीन प्रमाण वाढल्याचे अनेक रक्तदात्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. शिबिराचे वैशिष्ट्य अनेक जणांनी सहकुटूंब रक्तदान केले. शिवाय वैदैही पटवर्धन यांची रक्तदानाची २१ वी वेळ, तर उत्तम महाकाळ यांची ६१ वी वेळ होती.
कार्यक्रमासाठी दीपक पंडित, दीपक नलावडे यांनी संयोजन केले. संजीवनी रक्तपेढी, भोसरी यांचे विशेष सहकार्य मिळाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.