Vadgaon Maval : भाजप वडगांव शहर आयोजित रक्तदान महायज्ञात ३२७ जणांनी केले रक्तदान

0

एमपीसी न्यूज : छत्रपती शिवाजी महाराज जयंती व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवा निमित्त तसेच १ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी वडगांव शहराच्या वतीने ग्रामदैवत श्री.पोटोबा जोगेश्वरी मंदिर प्रांगणात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान महायज्ञात उत्स्फूर्तपणे विक्रमी ३२७ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.

_MPC_DIR_MPU_II

महिला रक्तदात्यांचा देखील सहभाग उल्लेखनीय होता तसेच प्लाझ्मा दान करणाऱ्या रक्तदात्यांची देखील नांव नोंदणी करण्यात आली. मावळ तालुका भारतीय जनता पार्टी प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली वडगांव शहर भाजपा अध्यक्ष किरण भिलारे आणि कार्यक्रम प्रमुख / नगरसेवक प्रविण चव्हाण यांच्या नियोजनातून हे शिबीर संपन्न झाले.

मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा उमा खापरे , मावळचे आमदार सुनिल शेळके, पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष गणेश भेगडे , मावळ तालुका भाजपा अध्यक्ष रविंद्र भेगडे आदींनी उपस्थित राहून या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले आणि कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिरासारखा अत्यावश्यक उपक्रम राबविल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

भास्करराव म्हाळसकर यांनी असे सामाजिक उपक्रम यापुढेही राबविण्यात येतील असे सांगितले. महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी देखील या रक्तदान महायज्ञासाठी पत्राद्वारे शुभेच्छा देखील दिल्या आणि या अभिनव उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य नितीन मराठे, मा.सदस्य चंद्रशेखर भोसले, प्रशांत ढोरे , माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर , माजी उपसभापती शांताराम कदम , लोणावळा नगराध्यक्ष सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, देहूरोड कॅन्टोन्मेंट उपाध्यक्ष रघुवीर शेलार, मावळ भाजपा सरचिटणीस सुनील चव्हाण, संघटन मंत्री किरण राक्षे, श्री पोटोबा देवस्थान संस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर , वडगांव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब म्हाळसकर, जेष्ठ मार्गदर्शक सोपानराव ढोरे, अरविंद पिंगळे,  अॅड.तुकाराम काटे , मिलिंद चव्हाण , पंढरीनाथ भिलारे, नंदकुमार दंडेल, मावळ कामगार आघाडी अध्यक्ष अमोल भेगडे , विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष अभिमन्यू शिंदे , सोशल मीडिया अध्यक्ष सागर शिंदे, ज्योती जाधव, क्रीडा आघाडी अध्यक्ष नामदेव वारींगे, जेष्ठ नेते विठ्ठल घारे , नामदेव भसे , बाबूलाल गराडे, यदुनाथ चोरघे, नंदकुमार भसे , सुरेश भंडारी, वसंतराव भिलारे, गोपाळराव भिलारे , अनिल गुरव , ग्राहक मंच महाराष्ट्र राज्य सचिव अरुण वाघमारे, काळूराम भोईरकर, आदी उपस्थित होते.

गटनेते / नगरसेवक दिनेश ढोरे , अॅड.विजयराव जाधव, किरण म्हाळसकर,दिलीप म्हाळसकर, शामराव ढोरे, प्रसाद पिंगळे,  माजी उपनगराध्यक्षा अर्चना म्हाळसकर , सुनिता भिलारे, दिपाली मोरे, वडगांव शहर सरचिटणीस रविंद्र म्हाळसकर , महिला मोर्चा अध्यक्ष धनश्री भोंडवे , व्यापारी मोर्चा अध्यक्ष भूषण मुथा , विद्यार्थी मोर्चा अध्यक्ष विकी म्हाळसकर, क्रिडा मोर्चा अध्यक्ष महेश म्हाळसकर माजी सरपंच नितीन कुडे, सुधाकर ढोरे, भरत म्हाळसकर, रविंद्र काकडे , शंकर भोंडवे , शेखर वहिले, कल्पेश भोंडवे,दिपक भालेराव, संतोष म्हाळसकर , योगेश कृ.म्हाळसकर , विनायक भेगडे, योगेश व. म्हाळसकर, संदीप म्हाळसकर , अमोल पगडे, निलेश म्हाळसकर, प्रज्योत म्हाळसकर, सतिश म्हाळसकर, चंद्रशेखर म्हाळसकर, विनायक चिखलीकर, अतुल म्हाळसकर , मनोज गवारी, समीर गुरव,  गणेश गवारी, कुलदीप ढोरे, विशाल म्हाळसकर , दिलीप रा.चव्हाण,मोरेश्वर पोफळे, मनोज जाधव , प्रशांत चव्हाण , विनोदबाप्पू चव्हाण , महेश अ. म्हाळसकर, अमोल ठोंबरे, अभिषेक चव्हाण, शरद मोरे ,श्रीकांत चांदेकर, गणेश काळे, किरण आचार्य, मंदार काकडे, संतोष भालेराव, महेश खेंगले,अभिषेक भोंडवे, आकाश म्हाळसकर, अनिल ओव्हाळ, श्लोक पिंगळे , यश दाभाडे, अरूण सुळके, महेश दायमा , आनंद कुमार

महिला मोर्चा कार्याध्यक्ष वैशाली म्हाळसकर , दिपाली ढोरे , अर्चना कुडे, पूजा पिंगळे , शितल मुथा , संगीता ढोरे , स्नेहल बाफना , सुषमा जैन , सुवर्णा गाडे ,  आशा चोपडे , संगीता खेंगले , सुषमा भोंडवे , स्नेहल औटी आदींनी नियोजन केले रक्तदात्यांना सन्मान चिन्ह, सन्मान पत्र आणि मोफत रक्त पिशवी कुपन, पॉवर बँक , प्रेशर कुकर , तुळस कुंडी , कोरोना प्रतिबंधक किट भेट देण्यात आली.

स्वागत शहराध्यक्ष किरण भिलारे यांनी केले,  प्रास्ताविक महिला मोर्चा अध्यक्ष धनश्री भोंडवे यांनी केले, सूत्रसंचालन तालुका प्रसिद्धी प्रमुख अनंता कुडे यांनी तर आभार प्रदर्शन युवा मोर्चा अध्यक्ष रमेश ढोरे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment