Bobby Deol : आता बॉबी झळकणार वेब सिरीजमध्ये

एमपीसी न्यूज – सध्याच्या या बदलत्या काळात आता मनोरंजन क्षेत्रामध्ये देखील बदलाचे वारे वाहू लागले आहेत. चित्रपटगृहे सध्या बंद असल्याने प्रदर्शनासाठी तयार असलेल्या चित्रपटांच्या रिलीजसाठी निर्मात्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मची मदत घेतली.

अनेक कलाकार देखील वेब सिरीजमधून डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करीत आहेत. आता या अभिनेत्यांच्या यादीमध्ये बॉबी देओलचे नाव देखील आले आहे. लवकरच अभिनेता बॉबी देओल डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे.

बॉबी देओलने ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे.  ‘हा आहे आश्रममधील फर्स्ट लूक. ही वेब सीरिज २८ ऑगस्ट २०२० रोजी एमएक्स प्लेअरद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे’ असे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे. ‘आश्रम’ या सिरीजमध्ये बॉबी देओलसोबत चंदन रॉय सान्याल, आदिती पोहनकर, दर्शन कुमार आणि अध्ययन सुमन हे कलाकार दिसणार आहे. तसेच या सिरीजचे दिग्दर्शन प्रकाश झा करत आहेत.

बॉबीने शेअर केलेल्या वेब सीरिजच्या फर्स्ट लूकमध्ये तो एकदम वेगळ्या अंदाजात दिसत आहे. त्याचा हा लूक पाहून तो साधूच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.