Nagphani : नागफणीमध्ये आढळला मृतदेह; दिल्लीतील बेपत्ता तरुण असल्याची शंका!

एमपीसी न्यूज : पुण्याजवळील लोणावळ्यातील नागफणी (Nagphani) येथे एका तरुणाचा मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह बेपत्ता असलेल्या फरहान अहमदचा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

दिल्लीस्थित मेकॅनिकल इंजिनीअर फरहान अहमद हा शुक्रवारी दुपारपासून नागफणीच्या जंगलात बेपत्ता झाला. त्याने आपल्या भावाला तो रस्ता चुकल्याचे फोनद्वारे कळवले. त्यानंतर त्याचा फोन बंद आला, तसेच त्याचा कोणत्याही प्रकारे संपर्क झाला नाही. त्याच्या कुटुंबाने तातडीने लोणावळा पोलिसांना कळवले. आणि त्याची शोधमोहीम सुरू झाली.

Duke’s Nose : दिल्लीचा अभियंता हरवला लोणावळ्यात; पोलिसांची शोधमोहीम सुरू

Nagphani

आज चार दिवसांनी याच नागफणीच्या (Nagphani) जंगलात आयएनएस शिवाजीच्या टीमला एक बॉडी लोकेट झाली. ही बॉडी फरहानचीच असावी असा संशय येत आहे. घटनास्थळी एनडीआरएफची टीम देखील दाखल झाली आहे. अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. मृतदेह वर आणण्याचे काम चालू आहे. त्यामुळे मृतदेह नक्की कोणाचा हे निष्पन्न झालेले नाही. सविस्तर माहिती लोणावळा पोलिस काही वेळातच जाहीर करतील.

फरहान हरवल्यापासून शिवदुर्ग स्वयंसेवकांव्यतिरिक्त, खोपोलीमधील यशवंत हायकर्सचे सदस्य तसेच पोलिस प्रशासन आयएनएस आणि एनडीआरएफ यांचे प्रयत्न सुरू आहेत. फरहानच्या कुटुंबीयांनी त्याला शोधण्यासाठी 1 लाखाचे बक्षीस देखील जाहीर केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.