Sangvi : बेपत्ता असलेल्या हॉटेल मालकाचा पवना नदीत आढळला मृतदेह

एमपीसी न्यूज – दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या हॉटेल मालकाचा पवना नदीत मृतदेह आढळला. ही घटना शनिवारी (दि. 28) दुपारी चारच्या सुमारास दापोडी रस्त्यावर उघडकीस आली आहे.

राजकुमार थापा (वय 45, सध्या रा. सांगवी, मूळ रा. नेपाळ) असे मृतदेह आढळलेल्या हॉटेल मालकाचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, थापा यांचे सांगवी येथे अर्चना नावाने हॉटेल आहे. ते मागील दोन दिवसांपासून अचानक गायब झाले होते.
याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. शनिवारी दुपारी चारच्या सुमारास दापोडी रस्त्यावरील नदीपात्रात अनोळखी मृतदेह असल्याची माहिती मिळली. त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता थापा यांचा मृतदेह असल्याचे आढळून आले. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह औंध येथील रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.