Bold photo shoot of Anushka – अनुष्काने केले विराटला ‘क्लिन बोल्ड’, पाहा अनुष्काचे बोल्ड फोटो शूट…

Bold photo shoot of Anushka - Anushka did 'Clean Bold' to Virat अनुष्का शर्मा एका हॉट फोटोशूटमुळे आणि त्यावर पती विराट कोहलीने दिलेल्या कमेंटमुळे चर्चेत आली आहे.

एमपीसी न्यूज – लॉकडाउनमुळे सध्या सगळे घरातच बंद आहेत. तसेच कलाकार आणि खेळाडू देखील घरातच आहेत. ना शूटिंग ना मॅचेस. एक बॉलिवूड स्टार आणि एक क्रिकेटपटू अशी जोडी असलेले विरुष्का सध्या घरातच आहेत. विरुष्का म्हणजे विराट आणि अनुष्का. मात्र अनुष्का आणि विराट नेहमी सोशल मिडियावर सक्रिय असतात. अनुष्का नेहमी काहीतरी पोस्ट करत असते. काही दिवसांपूर्वी ती तिच्या वेबसीरिजमुळे चर्चिली जात होती. मात्र यावेळी ती एका हॉट फोटोशूटमुळे आणि त्यावर पती विराट कोहलीने दिलेल्या कमेंटमुळे चर्चेत आली आहे.

अनुष्काने काही दिवसांपूर्वी तिच्या फोटोशूटमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. तिने वोग मासिकासाठी हे फोटोशूट केलं होतं. त्यामुळे यातील काही फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या फोटोंमध्ये ती अत्यंत बोल्ड दिसत आहे. यातील विराटच्या सेन्सेशनल कमेंटमुळे अनेकांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं आहे.

अनुष्काचे हॉट आणि बोल्ड फोटो पाहिल्यानंतर त्याच्यावर कमेंट करण्याचा मोह विराटलादेखील आवरता आला नाही. विेशेष म्हणजे अनुष्काने शेअर केलेल्या प्रत्येक फोटोवर त्याने कमेंट केली आहे. विराटने अनुष्काच्या प्रत्येक फोटोवर फायर, हार्ट आणि स्माइलीच्या काही इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे.

काही दिवसांपूर्वी अनुष्का तिच्या ‘बुलबुल’ आणि ‘पाताल लोक’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आली होती. या सीरिजच्या माध्यमातून तिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. या दोन्ही सीरिज अनुष्काच्या प्रॉडक्शन हाऊसची निर्मिती आहेत. या दोन्ही वेब सिरिजला नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

View this post on Instagram

💛 @vogueindia @anaitashroffadajania

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

View this post on Instagram

For shore! 🌊 @vogueindia @anaitashroffadajania

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.