Bollywood: महाराष्ट्र पोलिसांच्या सन्मानासाठी सलमान, अजय देवगण, शहारूख, अक्षयकुमार, माधुरी आदींनी बदलला डीपी
एमपीसी न्यूज – करोना योद्धांच्या सन्मानासाठी मी फेसबुक, ट्विटर व इन्स्टाग्रामवर महाराष्ट्र पोलिसांचा लोगो ठेवणार आहे. तुम्हीही असाच डीपी ठेवून पोलीस बांधवांना सन्मान द्या, असे भावनिक आवाहन बॉलीवूड सुपरस्टार ‘भाईजान’ सलमान खानने केले आहे. सलमानबरोबरच ‘सिंघम’ अजय देवगण तसेच शहारूख खान, अक्षयकुमार, माधुरी दीक्षित आदी सिलेब्रिटींनी देखील आपापले डीपी बदलून महाराष्ट्र पोलिसांच्या कामाचा गौरव केला आहे.
सोशल मिडीयावरील डीपी बदलणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये विद्या बालन, कॅटरिना कैफ, रणवीर सिंग, जॅकलीन फर्नांडिस, टायगर श्रॉफ, कार्तिक आर्यन, दिशा पटनी, विकी कौशल, अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर, क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आदींचा समावेश आहे.
करोना काळात रात्रंदिवस काम करणा-या पोलीस आणि अन्य कर्मचाऱ्यांसाठी सन्मान व्यक्त करावा असे यानिमित्ताने त्याला वाटत आहे. सध्या बाकी सगळे घरी आहेत, कुटुंबियांसमवेत आहेत. पण हे सर्व करोना वॉरियर जिवाची बाजी लावून काम करत आहेत. त्यामुळे ‘या योद्धांच्या सन्मानासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने सोशल मीडिया अकाऊंटवर डीपी म्हणून महाराष्ट्र पोलिसांचा लोगो ठेवावा’, असं आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं होतं. त्यानुसार अभिनेता सलमान खानसह अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या डीपीमध्ये बदल केला आहे.
सलमानने त्याच्या प्रोफाइलमध्ये महाराष्ट्र पोलिसांचा लोगो लावला आहे. फेसबुकप्रमाणेच त्याने इन्स्टाग्राम आणि ट्विटरचं प्रोफाइलही बदललं आहे. त्यामुळे सध्या चाहते त्याचं कौतुक करत आहेत. सलमानप्रमाणेच रितेश देशमुख, कतरिना कैफ, करण जोहर या सारख्या कलाकारांनीही त्यांचे सोशल मीडियावरील प्रोफाइल बदलले आहेत.
केवळ देशाच्या जनतेसाठी पोलीस दिवसरात्र मेहनत करत आहेत. त्यातच महाराष्ट्र पोलीसदेखील अहोरात्र काम करत असून २४ तास त्यांची सेवा बजावत आहे. एकीकडे सामान्य नागरिक घरात राहून स्वत:ची काळजी घेत आहेत. तर घराबाहेर या नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात आहेत. त्यामुळे सलमानने त्यांचे काही दिवसापूर्वी त्याचे फेसबुक प्रोफाइल बदलले.
“सदैव देशसेवेस कर्तव्यतत्पर असणारे पोलीस एकटे नाहीत हे अधोरेखित करण्यासाठी त्यांच्या सन्मानार्थ मी फेसबुक, ट्विटर व इन्स्टाच्या अकाऊंटवर डीपी म्हणून महाराष्ट्र पोलिसांचा लोगो ठेवणार आहे. तुम्हीही आपला डीपी ठेवून पोलीस बांधवांच्या सन्मानात सहभागी व्हा”,असं ट्विट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं होतं. त्यांच्या या आवाहनानंतर अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील डीपी बदलले आहेत.
Tere bina… wishing all mothers a v happy Mother’s Dayhttps://t.co/xWPluF2nDe@Asli_Jacqueline #AjayBhatia @Musicshabbir @adityadevmusic @abhiraj21288 #SaajanSingh#TereBinaTeaser
— Salman Khan (@BeingSalmanKhan) May 10, 2020