Bollywood: काय माधुरीला देखील लग्नासाठी नकार पचवावा लागला ?

Bollywood: Did Madhuri also have to digest the refusal for marriage?

एमपीसी न्यूज​ ​-‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितचा आज वाढदिवस. माधुरीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जेव्हा माधुरी चित्रपटसृष्टीत टॉपला होती तेव्हा आपली बायको ही माधुरी दीक्षितसारखीच असावी अशी अनेक मुलांची अपेक्षा असे. ‘लाखो दिलोंकी धडकन’ असणा-या माधुरीलाही ‘अरेंज मॅरेज’मध्ये नकार पचवायला लागला होता. आणि तो सुद्धा एका वेगळ्याच कारणासाठी. यामागील राज काय आहे ते आपण जाणून घेऊया..

असे म्हटले जाते की, माधुरीच्या लग्नाचा जेव्हा तिच्या घरातले विचार करत होते, तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर गायक सुरेश वाडकर यांचं नाव आलं होतं. याबद्दल वाडकरांना विचारण्यातही आलं होतं. पण त्यांनी माधुरीचं आलेलं स्थळ स्पष्टपणे नाकारलं.

माधुरीचं घर पारंपरिक विचारांचं असल्यामुळे त्यांना माधुरीने सिनेमांमध्ये काम करणं फारसं पसंत नव्हतं. त्यामुळेच खूप आधीपासून तिचे वडील तिच्यासाठी स्थळं शोधत होते. वराच्या शोधात माधुरीचे वडील सुरेश वाडकरांकडे तिचं स्थळ घेऊन गेले.

_MPC_DIR_MPU_II

जेव्हा माधुरीचे वडील वाडकरांकडे हे स्थळ घेऊन गेले होते तेव्हा तेही संगीतसृष्टीत आपला जम बसवत होते. पण माधुरीच्या आणि वाडकर यांच्या वयात १२ वर्षांचा फरक होता. त्यावेळी वाडकरांनी माधुरीशी लग्नाचा प्रस्ताव मुलगी खूपच बारीक असल्याचे कारण देत फेटाळला होता. या नकारामुळे माधुरीच्या आई- वडिलांना फार दुःख झाले. पण, त्यानंतर माधुरीला सिनेमांमध्ये काम करण्याची परवानगी मिळाली. या घटनेनंतर अनेकदा माधुरीच्या सिनेमांसाठी सुरेश वाडकरांनी पार्श्वगायनही केलं.

माधुरीने १९८४मध्ये ‘अबोध’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर ‘तेजाब’पासून तिचे चित्रपट हिट होऊ लागले. मग तिने मागे वळून पाहिलेच नाही. मात्र कारकीर्दीच्या शिखरावर असताना १९९९ मध्ये अमेरिकावासी डॉ. श्रीराम नेने यांच्याशी माधुरीने लग्न करून परदेशात संसार थाटला.

माधुरीला दोन मुलगे असून, ती संसारात रमली आहे. आता ती भारतात परतली असून त्यानंतर तिने काही हिंदी चित्रपट देखील केले. मागील वर्षी तिने तिची निर्मिती असलेला तिचा मराठीतील पहिला चित्रपटा ‘बकेट लिस्ट’ केला. यात सुमीत राघवन तिचा हिरो  होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.