Bollywood: शाहिदचे मीराला खमंग सरप्राइज…

Bollywood: shahid kapoor gives delicious surprise to wife Mira अलीकडेच तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर करत लग्नानंतर पहिल्यांदाच शाहिदने तिच्यासाठी एक खास पदार्थ बनवल्याचे म्हटलं आहे.

एमपीसी न्यूज- आजकाल लॉकडाऊन इफेक्ट म्हणून वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. या लॉकडाऊनने अनेकांना अनेक गोष्टी शिकवल्या. पण या वेगवेगळ्या गोष्टी करणारे जर सेलिब्रेटी असतील तर त्याची वेगळीच चर्चा होते.

सध्या अशीच एक वेगळी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. चित्रपटात ‘मै तुम्हारे लिये चांद तारे भी तोड लाऊंगा’ असं म्हणणारे सेलिब्रेटी प्रत्यक्षात मात्र काहीच करत नाहीत. अशावेळी जर एखाद्या नवऱ्याने त्याच्या बायकोसाठी स्पेशल डिश बनवली तर ती कौतुकाची बाब ठरते.

बॉलिवूडमधील एक फेमस जोडी म्हणजे अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा. या दोघांनी २०१५ मध्ये लग्न केलं. मीरा कलाविश्वात सक्रिय नसली तरीदेखील सोशल मीडियावर शाहिदपेक्षा तिचा जास्त वावर असल्याचं पाहायला मिळतं.

अलीकडेच तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर करत लग्नानंतर पहिल्यांदाच शाहिदने तिच्यासाठी एक खास पदार्थ बनवल्याचे म्हटलं आहे.

शाहिदने पहिल्यांदाच मीरासाठी खास पदार्थ तयार केला. या पदार्थाचा फोटो मीराने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये टाकला आहे. “पाच वर्षांत पहिल्यांदाच माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी जेवण तयार केलं आहे. आजपर्यंत खाल्लेल्या पास्तांपैकी हा सगळ्यात बेस्ट आहे”, अशी कॅप्शन मीराने पोस्ट शेअर करत दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.