Bollywood: विद्या बालनचा ‘शकुंतलादेवी’ OTT वर रिलिज होणार

Bollywood: Vidya Balan's 'Shakuntaladevi' will be released on OTT

एमपीसी न्यूज – सध्या लॉकडाऊनमुळे चित्रपट प्रदर्शित होणे बंद झाले आहे. अनेक चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. अशावेळी हे चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर रिलिज केले जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. ‘गुलाबो सिताबो’ नंतर आता ‘शकुंतलादेवी’ हा चित्रपट  OTT प्लॅटफॉर्मवर रिलिज होणार आहे.

यात चतुरस्त्र अभिनेत्री विद्या बालन लीड रोल करत आहे. शकुंतलादेवी या गणितज्ञ होत्या. कोणतीही बेरीज वजाबाकी त्या सहजगत्या करुन दाखवत. कितीही अंकी गणित असले तरी त्या पटापट आकडेमोड करु शकत. रुढार्थाने त्यांनी त्याचे शिक्षण घेतले नव्हते. पण त्या अत्यंत जिनीयस होत्या. त्यांना मानवी संगणक म्हटले जात असे. ४ नॊव्हेंबर १९२९ ला बंगलोरमध्ये शकुंतलादेवी यांचा जन्म झाला. त्यांच कुटुंब म्हणजे पारंपरिक कन्नड ब्राह्मण .पण शकुंतला देवी यांचे वडील नव्या युगातले, त्यांनी आपल्या भिक्षुकीच्या पारंपारिक व्यवसायाला आणि मंदिरातील परंपरागत पुजारी होण्याला नकार देऊन सर्कस मधील आडवाटेवरची नोकरी धरली .

शकुंतलादेवीचे वडील सर्कसमध्ये काम करत होते. तीन वर्षाच्या शकुंतलाला पत्त्याचे खेळ शिकवताना तिच्या अफाट स्मरणशक्तीचे त्यांना ज्ञान झाले. त्यांनाच तिच्यामधील झपाट्याने गुणाकार-भागाकार करण्याची शक्तीची पहिल्यांदा ओळख पटली. सर्कस सोडून ते शकुंतलाचेच रोडशो करू लागले. वयाच्या ६व्या वर्षी शकुंतलाने म्हैसूर विद्यापीठात आपल्या अंकगणितीय कौशल्याचे प्रदर्शन केले. शकुंतलादेवी यांच्या अंगी एक अदभूत प्रतिभा होती की अख्ख्या भारतास त्याची दाखल घ्यावी लागली .चक्का गुगल ने त्यांच्या पहिल्या जयंतनिमित्त डुडल बनवून त्यांना आदरांजली वाहिली होती.

अशा या शकुंतलादेवींची भूमिका व्यक्तिरेखा साकारण्यात तरबेज असणारी विद्या बालन करणार आहे. याआधी देखील विद्याने ब-याच ख-या व्यक्तिरेखा पडद्यावर हुबेहूब साकारल्या आहेत. त्यात दाक्षिणात्य अभिनेत्री ‘सिल्क स्मिता’ तिने अप्रतिम साकारली होती.

अद्याप याची रिलिज डेट जाहीर झाली नाही. हा सिनेमा ८ मे रोजी रिलिज होणार होता. पण चित्रपटगृहे बंद असल्याने शेवटी Amazon Prime याच्या वर्ल्ड प्रिमियरची घोषणा केली. यात विद्यासोबत जिसू सेनगुप्ता आणि सान्या मल्होत्रा भूमिका साकारत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.