Bollywood: शादी तो करेंगे, पर लॉकडाऊन के बाद, असं कोण कोण म्हणतंय बरं…

Bollywood: Will marry, but after lockdown, know who says this...

-MPC-FIRST-TOP-BANNER-I
एमपीसी न्यूज – करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांचे विवाह सोहळे पुढे ढकलण्यात आले आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांच्या लग्नाचे प्लॅनिंग केले होते. पण लॉकडाऊनमुळे त्यांना ते पुढे ढकलावे लागले आहे. मात्र लॉकडाऊन उठल्यावर हे कलाकार लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.

अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर गेल्या कित्येक दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. हे त्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणाही केली होती. लॉकडाउन संपल्यावर हे कपल लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून वरुण धवन गर्लफ्रेंड नताशा दलालमुळे चर्चेत आहे. चाहते त्यांच्या लग्नासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे. या आधी वरुणच्या वाढदिवशी साखरपुडा होणार असल्याचे म्हटले जात होते. पण लॉकडाऊनमुळे आता त्याचे लग्न पुढे ढकलण्यात आल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

नुकतेच ‘बाहुबली’मधील भल्लालदेव म्हणजेच लोकप्रिय अभिनेता राणा डग्गुबातीने गर्लफ्रेंड मिहिका बजाजने लग्नासाठी होकार दिल्याचे म्हटले आहे. दोघेही लवकरच साखरपुडा करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. हे कपल लॉकडाऊननंतर लग्न बंधनात अडकू शकतात, असे म्हटले जात आहे.

बॉलिवूडची बबली, क्यूट गर्ल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यंदा लग्नबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात होते. लॉकडाउन संपताच त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण ऋषी कपूर यांच्या निधनानंतर हे कपल कधी लग्नबंधनात अडकणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट केल्यानंतर रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल एप्रिल महिन्यात लग्न बंधनात अडकणार होते. त्यांचे डेस्टिनेशन पण ठरले होते. पण तेवढ्यात आलेल्या करोनाच्या उद्रेकामुळे त्यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.