Bollywood: ‘बेबी डॉल’ची संपत्ती बघून तुम्ही व्हाल थक्क!

Bollywood: You'll be amazed at the wealth of 'Baby Doll'!

एमपीसी न्यूज – ‘बेबी डॉल’ सनी लिओनीने एक पॉर्नस्टार म्हणून सुरुवात केली. नंतर तिने आपला मार्ग बदलत बॉलिवूडकडे वाटचाल केली.  या आयटम साँगने तिला बॉलिवूडमध्ये भरभरून प्रसिद्धी दिली. पण त्यानंतर आपल्या आयुष्याला एक वेगळं वळण देणाऱ्या सनीच्या संपत्तीचा आकडा पाहून तुम्ही थक्क व्हाल.

एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार सनीचा मुंबईतील बंगला, अमेरिकेतील फ्लॅट, महागड्या गाड्या हे सर्व मिळून एकूण ९७ कोटींची ती मालकीण आहे. काही वर्षांपूर्वीच सनीने अमेरिकेत फ्लॅट विकत घेतला. त्याची किंमत ३० कोटींहून अधिक असल्याचं म्हटलं जातं. तर मुंबईतील तिच्या बंगल्याची किंमत ३ कोटी इतकी आहे.

‘बेबी डॉल’ या गाण्यावर थिरकणा-या सनीची त्या आधी एक पॉर्नस्टार असीच ओळख होती. पण त्या गाण्याने तिचं आयुष्यच बदललं. ‘अपनी तो निकल पडी’ अशीच तिची त्यानंतर बॉलिवूडमध्ये वाटचाल राहिली. त्यातचे तिने ‘बिग बॉस’च्या पाचव्या पर्वात तिने सहभाग घेतला. यावेळी खऱ्या आयुष्यात सनी कशी आहे, हे प्रेक्षकांना समजलं.

पुढे सनीने २०११ मध्ये डॅनिअर वेबरशी लग्न केलं. सनीच्या संपूर्ण प्रवासात डॅनिअलने तिची साथ दिली. लग्नापूर्वी काही वर्ष हे दोघं रिलेशनशिपमध्ये होते. या दोघांनी निशा या मुलीला दत्तक घेतलं. त्यानंतर सरोगसीच्या माध्यमातून त्यांना दोन मुलं झाली. त्यापैकी एकाचं नाव अॅशर आणि दुसऱ्याचं नोआ आहे. पती डॅनिअल आणि तीन मुलं असं सनीचं कुटुंब आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.