Bollywood: परेश रावल यांचे ‘ते’ ट्वीट चर्चेत
Bollywood: Paresh Rawal's tweet in discussion
एमपीसी न्यूज – ‘बाबूभैया’ म्हणजेच बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते परेश रावल सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. भाजपाचे माजी खासदार असलेले परेश रावळ सामाजिक विषयांवर उघडपणे त्यांचे मत मांडताना दिसतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी अभिनेता अक्षय कुमारला पाठिंबा देत त्याला ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच सुनावले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी केलेले ट्वीट चर्चेत आहे.
परेश रावळ यांनी ट्वीटमध्ये सध्या देशात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ‘काही दिवस लोकं सेल्फी घेण्यासाठी विचारण्याची हिम्मत करणार नाहीत आणि त्यासाठी त्रासही देणार नाहीत’, असे म्हटले आहे. त्यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून चाहते त्यावर कमेंट करताना दिसत आहेत.
सध्या करोनामुळे फक्त देशातच नव्हे तर संपूर्ण जगात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. संसर्गातून पसरणाऱ्या या व्हायसरचा संसर्ग थांबवण्यासाठी प्रशासनाने सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यास सांगितले आहे. त्यामुळे परेश रावल यांनी पुढचे काही दिवस लोकं जवळ येऊन सेल्फी घेण्याची हिम्मत करणार नाहीत असे म्हटले असावे.
त्यांच्या या ट्वीटवर एका यूजरने ‘लोकं तुम्हाला तरीही विचारतील पण त्यांच्यासोबत सेल्फी काढायची तुमची हिम्मत होणार नाही’ असे म्हटले आहे. तर ‘सेल्फी के लिये कुछ भी’ अशी वृत्ती असणा-या लोकांबद्दल बोलताना दुसऱ्या एका चाहत्याने त्यावर उपाय सुचवला आहे. हा चाहता रिप्लायमध्ये म्हणतो, ‘बाबू भैया, सेल्फीस्टीक आहे ना’.
Atleast for some time people will not dare ask or bother for Selfie 🤳!
— Paresh Rawal (@SirPareshRawal) May 15, 2020