Pakistan : पाकिस्तानच्या मशिदीमध्ये बॉम्बस्फोट; 32 जण ठार

एमपीसी न्यूज : पाकिस्तानमध्ये (Pakistan) पेशावरच्या पोलीस लाइन्स भागातील मशिदीमध्ये आज भीषण बॉम्बस्फोट झाला. यामध्ये किमान 32 जण ठार झाले असून 147 जण जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानजवळील पेशावरमध्ये दुपारच्या नमाजादरम्यान ही घटना घडली.

पोलिस अधिकारी सिकंदर खान यांनी सांगितल्याप्रमाणे, आज मोठ्या संख्येने लोक नमाजासाठी मशिदीमध्ये जमले होते. यावेळी स्फोट झाला. यावेळी मशिदीत सुमारे 260 लोक जमले होते.

Maharashtra : दिल्लीत महाराष्ट्राच्या चित्ररथाला द्वितीय क्रमांक; लोककला आणि नारी शक्तीचा सन्मान

स्फोट झाल्याने इमारतीचा एक भाग कोसळला असून त्याखाली अनेक लोक अडकले असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

घटनास्थळावर पोलीस आणि तपास यंत्रणा पोहचल्या असून तपास सुरु आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं घेतलेली नाही.  जखमीना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.