Pimpri : आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याने ‘एजीओ’ कंपनीतील कामगारांना बोनस

100 कामगारांना मिळाला साडे सोहळा हजार बोनस

950

एमपीसी न्यूज – पिंपरी, नेहरुनगर येथील कायमस्वरुपी कामगारांची दिवाळी गोड होणार आहे. आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याने कंपनीतील 100 कामगारांना 16 हजार 400 रुपये बोनस मिळाला आहे. यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, असे ‘एजीओ’ कामगार संघटनेचे खजिनदार हनुमंत (बाळा)शिंदे यांनी सांगितले.

HB_POST_INPOST_R_A

पिंपरी, नेहरुनगर येथे ‘एजीओ’ फार्मास्युटीकल कंपनी आहे. या कंपनीत 100 कामगार कायस्वरुपी आहेत. कंपनीतील ‘एजीओ’ कामगार संघटना आणि व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींची अनेक दिवसांपासून बोनसबाबत चर्चा सुरु होती. बोनस किती द्यायचा यावर तोडगा निघत नव्हता. त्यानंतर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी यामध्ये पुढाकर घेतला. संघटनेचे पदाधिकारी आणि व्यवस्थापनच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत कामगारांना 16 हजार 400 रुपये बोनस देण्याचे निश्चित झाले.

यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पंकज चांडक, कामगार नेते सचिन लांडगे, संघटनेचे अध्यक्ष विलास बालवडकर, उपाध्यक्ष रतन नांदुरकर, खजिनदार हनुमंत (बाळा)शिंदे, दिपक मोळक, चंद्रकांत जाधव, ज्ञानेश्वर नेवाळे, शिवराज पाटील, मानव संसाधन विभाग (एचआरचे)जयदीप शिंदे उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे म्हणाले, ‘कामगार नेहमी आनंदी असला पाहिजे. कामगार आनंदी राहिला तरच कंपनीची भरभराट होते. त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत. त्यांचे प्रश्न सोडविल्यास ते हिरारीने काम करतात. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने त्यांच्या मागण्या समजावून घेऊन सोडविणे अपेक्षित आहेत. व्यवस्थापनाचा सकारात्मक प्रतिसाद आणि कामगारांचा समजूतदारपणा उपयोगी पडला. त्यामुळेच कामगारांना गतवर्षीपेक्षा दोन हजारांनी बोनस जास्त मिळाला आहे. यंदा कामगारांना 16 हजार 400 रुपये बोनस मिळाला आहे’.

‘एजीओ’ कामगार संघटनेचे खजिनदार हनुमंत (बाळा)शिंदे म्हणाले, ‘बोनस मिळवून देण्याबाबत आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला. कंपनी व्यवस्थापनाने देखील सकारात्मक भुमिका घेतली. त्यामुळे गतवर्षीपेक्षा दोन हजार रुपये बोनस अधिक मिळाला आहे. 2016 मध्ये 12 हजार, 2017 मध्ये 14 हजार 400 रुपये आणि 2018 मध्ये 16 हजार 400 रुपये बोनस मिळाला आहे’.

.

HB_POST_END_FTR-A1
%d bloggers like this: