Vadgaon Maval : उर्से महाराष्ट्र मजदूर संघटनेकडून बांधकाम कामगारांच्या मुलांना संचवाटप

एमपीसी न्यूज :  उर्से महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या विशेष प्रयत्नांतून महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ (महा-राज्य) कष्टकरी बांधकाम कामगारांच्या पाल्यांना  व्यक्तिमत्त्व विकास पुरुष संच योजना क्र  २२ चे वाटप करण्यात आले. एकूण ३५ पाल्यांना महाराष्ट्र मजदूर ‘संघटनेच्या प्रयत्नातून लाभ मिळाला. महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला

कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्र मजदूर संघटनेचे संघटक प्रदीप मारुती धामणकर कार्याध्यक्ष परेश मोरे, उज्वला गजरे, महेश हुलावळे, उत्तम पोटवडे, दादाभाऊ धामणकर, बाळासाहेब धामणकर, गुलाब आंबेकर, सोपान वाळूंज, रमेश घारे, वामन ठाकूर, यशवंत ठाकूर, मारुती राउत आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रदीप धामणकर आपल्या भाषणात म्हणाले की बांधकाम कामगारांच्या एकूण २८ योजना आहेत.  या योजनांचे लाभ सर्व बांधकाम कामगारांनी वेळोवेळी घ्यावा. त्यामधे शैक्षणिक लाभ असेल, नोंदीत बांधकाम कामगारांना घर बांधण्यासाठी गृहकर्ज असेल, नोंदीत बांधकाम कामगारांच्या स्वतःच्या विवाहासाठी योजना असेल अशा एकूण २८ योजना आहेत. या योजनांचा वेळोवेळी लाभ घ्यावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.