Pune : ‘रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद’ या शोधनिबंधाचे शनिवारी प्रकाशन

एमपीसी न्यूज- डॉ. अशोक मोडक संशोधित ‘ रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद ‘ या विषयावरील पुस्तक स्वरूपातील शोधनिबंधाचा प्रकाशन कार्यक्रम शनिवारी (दि. 19) आयोजित करण्यात आला आहे.

‘संशोधन -ज्ञान -विचार प्रतिष्ठान’च्या ‘डॉ. श्रीपती शास्त्री रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘संशोधन -ज्ञान -विचार प्रतिष्ठान’चे अध्यक्ष नितीन देशपांडे यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.

हा प्रकाशन कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र -कुलगुरू डॉ . एन. एस. उमराणी यांच्या हस्ते गरवारे कॉमर्स कॉलेजच्या सावरकर सभागृहात , शनिवारी (दि. 19) सकाळी 10 वाजता होणार आहे .

पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मंगेश कुलकर्णी, डॉ शरद खरे, डॉ. शरद देशपांडे इत्यादी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.