BNR-HDR-TOP-Mobile

Mawal : ” क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले “या पुस्तकाचा अनावरण सोहळा

199
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – 21 व्या शतकात महिलांनी सर्वच क्षेत्रात आपले वर्चस्व निर्माण केले याचे खरे श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते असे स्त्रीमुक्तीच्या आद्यप्रवर्तक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या पुस्तकाचा अनावरण सोहळ्यात झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. सावित्रीबाई फुले यांच्या 188 व्या जयंतीनिमित्त नायगाव या त्यांच्या जन्मगावी पुस्तक अनावरण सोहळ्याचा कार्यक्रम झाला. यामध्ये स्नेहल बाळसराफ यांचा पुस्तकलेखनाबद्दल भुजबळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

.

मार्गदर्शन करताना भुजबळ पुढे म्हणाले कि, स्त्रियांच्या शिक्षणासाठी समाजाकडून होणारी अवहेलना सहन करून संपूर्ण जीवन समर्पित केल्यामुळेच सावित्रीबाई या स्त्रीमुक्तीच्या गंगोत्री आहे. आधुनिक सावित्रीच्या लेकींना फुले दांपत्यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची ओळख करून देण्यासाठी बाळसराफ यांनी लिहिलेले पुस्तक नक्कीच उपयोगी पडेल.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, समता परिषदेचे बापूसाहेब भुजबळ, माजी आमदार कमलताई ढोले पाटील, माजी महापौर उल्हासराव ढोले पाटील, मंजिरीताई घाडगे, डॉ. राजू जाधव, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. दत्तात्रय बाळसराफ व आदि मान्यवर उपस्थित होते.

.

HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: