Pune Vaccination News : मंगळवारच्या लसीकरणासाठी आज रात्री आठपासून बुकिंग सुरु : महापौर

एमपीसीन्यूज : पुणे महापालिका हद्दीत उद्या मंगळवारपासून 18 ते 44  वयोगटातील नागरिकांसाठी दोन केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. यात दोन्ही केंद्रांवर कोविशील्ड उपलब्ध असेल. लसीकरणासाठी स्लॉट बुकींगची सुविधा आज रात्री आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. बुकींग असणाऱ्या नागरिकांनाच लस दिली जाणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

पुणे महापालिका हद्दीतील 45 वर्षांवरील नागरिकांसाठी उद्या, मंगळवारी 50  केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. यात 40 केंद्रांवर कोविशील्ड तर 10 केंद्रांवर कोवॅक्सिन उपलब्ध असेल.

कोवॅक्सिन उपलब्ध असणाऱ्या 10 केंद्रांवर 13  एप्रिल 2021 पूर्वी पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनाच दुसरा डोस दिला जाईल.

तर कोविशील्ड उपलब्ध असणाऱ्या केंद्रांवर 27  मार्च 2021 पूर्वी पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांना प्राधान्य असेल. तसेच अपॉइंटमेंटनुसार येणाऱ्या 20  टक्के नागरिकांना पहिला डोस दिला जाणार असल्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.