Bopdev Ghat : बोपदेव घाटात झालेल्या खूनाचा उलगडा, आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – गोळीबाराच्या खूनानंतर (Bopdev Ghat) बोपदेव घाटात आणखी एका तरुणाचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. त्याचा खून हा डोक्यात दगड घालून करण्यात आला होता. याचा योगायोग म्हणजे दोन्ही खून हे मित्रांनी केल्याचे तपासात उघड झाले आहे. पुणे पोलिसांच्या युनीट एकच्या पथकाने आरोपीला अटक करत दुसऱ्या खुनाचाही छडा लावला आहे.

किरण भागवत थोरात (वय 26. रा.बिबेवाडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीने डोक्यात दगड घालून त्याचा नातेवाईक व मित्र धनंजय हरिदास गायकवाड (रा. सुखसागर नगर, पुणे) याचा 12 डिसेंबर रोजी खून केला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा एकचे पोलीस अंमलदार अजय थोरात यांना 17 डिसेंबर रोजी खबर मिळाली की, किरण याने त्याच्या सोबत फिरणाऱ्या मित्राचा खून करून मृतदेह बोपदेव घाटात टाकला आहे. तो सध्या चिंचवड येथील डांगे चौक परिसरात लपून बसला आहे.

पोलिसांचे तपासी पथक डांगे चौक येथे आले व त्यांनी काळा खडक येथील वस्तीच्या बोळामधून चालत जाणाऱ्या किरणला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने खून केल्याचे कबुल केले.

धनंजय व किरण हे दोघे मित्र होते तसेच नातेवाईकही (Bopdev Ghat) होते. त्यांच्यात पैशाच्या कारणावरून भांडण झाले होते. धनंजय हा 12 डिसेंबर रोजी किरणच्या घरी दारु पिऊन आला व त्याने किरणच्या आईला शिवीगाळ केली व घरावर दगडफेक करत गोंधळ घातला. यावेळी किरण याने त्याला समजावण्याचा प्रयत्न करत पैसे देण्याचे आश्वासन दिले. तरी त्याने किरणच्या तीन महिन्याच्या मुलीला जाळून टाकण्याची धमकी दिली, किरण याने त्याला गोड बोलून घरातून बाहेर काढले, दारु खरेदी केली व दुचाकीवरून धनंजयला घेऊन जाऊन बोपदेव घाटाच्या शेवटच्या टोकाला गेला.

धनंजय नशेत देखील धमकी देत होता. याच भिती व रागापोटी किरण याने धनंजयच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. तो मेला याची खात्री झाली असता किरण याने ओढत नेऊन मृतदेह दरीत ढकलून दिला व त्याची गाडी ही ढकलून दिली. या कबुली जबाबानंतर किरण याच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

हि कारवाई गुन्हे शाखा एक चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदिप भोसले, सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार अजय थोरात, अमोल पवार, इम्रान शेख, राहूल मखरे, निलेश साबळे, विठ्ठल साळुंखे यांनी केली.

Pune : आधी तरुणीसोबत शरीर संबंध; नंतर केले न्यूड फोटो व्हायरल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.