Bopkhel Crime News : सासरच्या लोकांना मारहाण करणाऱ्या जावयावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पत्नीला मारहाण करत असल्याने समजावण्यासाठी आलेल्या सासरच्या लोकांना जावयाने मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 22) रात्री दहा वाजता रामनगर, बोपखेल येथे घडली. याबाबत जावयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सतीश कैलास घुले (वय 34, रा. रामनगर बोपखेल) असे गुन्हा दाखल झालेल्या जावयाचे नाव आहे. याबाबत शुभम दिलीप अहिरराव (वय 20, रा. रामनगर बोपखेल) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सतीश याने रागाच्या भरात फिर्यादी आणि त्यांच्या घरातील लोकांना शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादी यांची बहीण काजल हिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

त्यामुळे फिर्यादी आणि त्यांच्या घरातील लोक त्यांचे भांडण सोडवण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपी सतीश याने घरातील सुरीने फिर्यादी यांच्या बहिणीच्या छातीवर मारून जखमी केले. तसेच फिर्यादी यांच्या दुसऱ्या बहिणीला हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.