Bopkhel Crime News : मोठमोठ्याने हॉर्न वाजवत जाणाऱ्यावर शस्त्राने वार; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – मोठमोठ्याने हॉर्न वाजवत जाणाऱ्यांस चार जणांनी मिळून मारहाण केली. तसेच हॉर्न वाजवणाऱ्या एकावर धारदार हत्याराने वार केले. ही घटना बुधवारी (दि. 4) रात्री रामनगर, बोपखेल येथे रिक्षा स्टॅण्ड समोर घडली.

भैय्या डोंगरे (वय 20), आतिष शिंदे (वय 21), अनिकेत जोगदंड (वय 25), हरी गोविंद पट्टेपाटील (वय 22, सर्व रा. रामनगर, बोपखेल) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत प्रकाश संजय मोरे (वय 19, रा. गणेशनगर, बोपखेल) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे मित्र बुधवारी रात्री सव्वाआठ वाजताच्या सुमारास मोठमोठ्याने हॉर्न वाजवत दुचाकींवरून जोरात गेले. या कारणावरून आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना हाताने मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी यांच्या मित्राला धारदार हत्याराने मारून जखमी केले आणि आरोपी पळून गेले.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.