Bopkhel Crime News : सिगारेटच्या पैशांवरून तरुणावर कोयत्याने वार; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – सिगारेटच्या पैशांवरून वाद घालून दोघांनी तरुणाला कोयत्याने मारून जखमी केले. त्यानंतर भांडण सोडविण्यासाठी आलेल्या जखमी तरुणाच्या वडिलांना देखील लाकडी दांडक्याने मारून जखमी केले. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

ही घटना मंगळवारी (दि. 9) सायंकाळी पावणे सहा वाजता रामनगर, बोपखेल येथे घडली.

प्रदीप अयोध्यानाथ गुप्ता (वय 38), मिथिलेश अयोध्यानाथ गुप्ता (वय 27, दोघे रा. रामनगर, बोपखेल) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत ताराचंद टुकी सोदे (वय 55, रा. रामनगर, बोपखेल) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोदे यांचा मुलगा आणि आरोपी गुप्ता यांच्यात सिगारेटच्या पैशांवर भांडण झाले. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी सोदे गेले असता आरोपींनी राहुलच्या डोक्यात कोयत्याने मारून जखमी केले. त्यानंतर फिर्यादी सोदे यांना देखील लाकडी दांडक्याने डोक्यात, पाठीत आणि हातावर मारून गंभीर जखमी केले.

पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.