Bopkhel: पुलाच्या भूमीपूजनाला विरोधी पक्षनेत्याला डावलले!

'प्रोटोकॉल' पाळला जात नसल्याचा दत्ता साने यांचा आरोप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे बोपखेलवासियांसाठी मुळा नदीवर बांधण्यात येणा-या पुलाच्या भूमीपजून कार्यक्रमात ‘प्रोटोकॉल’ पाळला नाही. पुलाच्या भूमीपूजन कार्यक्रमाचे मला निमंत्रण देण्यात आला नव्हते. महापालिकेचा कार्यक्रम भाजपचे कार्यक्रम नसतात. याचेही सत्ताधा-यांना भान नसते. विरोधी पक्षातील नगरसेवकांना सातत्याने सापत्नपणाची वागणूक दिली जाते. हे अत्यंत चुकीचे असून सत्ताधा-यांकडून वारंवार ‘प्रोटोकॉल’चे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 4 बोपखेल येथे उभारण्यात येणा-या मुळा नदीवरील पुलाच्या कामाचे भूमिपूजन आज (गुरुवारी) महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते झाले. मात्र, महापालिकेकडून विरोधी पक्षनेत्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रणच दिले नसून, पुन्हा एकदा शिष्टाचाराचा भंग केला असल्याची तक्रार विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी महापौरांकडे केली आहे. यामुळे महापालिकेकडून होणारी दुजाभावाची वागणूक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

  • ”पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पावणे दोन किलोमीटर लांबीच्या या पुलाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये केवळ एकच ठेकेदाराने निविदा भरली. हे काम 54 कोटी रुपयांत पूर्ण करावयाचे असून, त्याकरिता दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. मात्र, या निविदा प्रक्रियेत एकच ठेकेदार सहभागी झाल्याने, यामध्ये स्पर्धाच झाली नाही. त्यामुळे या निविदा प्रक्रियेबाबत” विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी शंका उपस्थित केली आहे.

सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, ”महापालिकेकडून ‘प्रोटोकॉल’चे पालन केले जाते. पुलाच्या भूमीपूजन कार्यक्रमाचे निमंत्रण विरोधी पक्षनेते दत्ता साने यांना मेलवरून पाठविण्यात आले होते. त्यांचा आरोप चुकीचा असून महापालिकेकडून ‘प्रोटोकॉल’चा भंग झालेला नाही”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.