BopKhel: बोपखेल येथील बहूउद्देशीय इमारतीच्या विस्तारासाठी 71 लाखांचा खर्च!

एमपीसी न्यूज – बोपखेल येथील बहूउद्देशीय इमारतीचा विस्तार तसेच टप्पा दोनमधील इतर अनुषंगिक कामे करण्यात येणार आहेत. या कामासाठी महापालिकेतर्फे ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. त्यासाठी सुमारे 81 लाख 37 हजार रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला.

यामध्ये रॉयल्टी व मटेरियल टेस्टींग शुल्क वगळून 80 लाख 95 हजार रूपये दर ठरवून निविदा मागविण्यात आल्या. त्यानुसार, तीन ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी व्ही. ए. झोंबाडे या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा 12.50 टक्के कमी दराने निविदा सादर केली. म्हणजेच 70 लाख 83 हजार रूपये अधिक रॉयल्टी चार्जेस 19 हजार आणि मटेरीयल टेस्टींग चार्जेसपोटी 21 हजार रूपये असे एकूण 71 लाख 25 हजार रूपये खर्च होणार आहेत.

महापालिका अतिरिक्त आयुक्त यांनी या कामांची निविदा स्वीकारण्यास 20 डिसेंबर रोजी मान्यता दिली आहे. एक वर्षात ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यानुसार, या ठेकेदारासमवेत करारनामा करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.