Bopkhel News: बोपखेल मधील गणेशनगर येथे सम-विषम तारखेस पार्किंग

एमपीसी न्यूज – बोपखेल मधील गणेशनगर येथे सम-विषम तारखेस पार्किंग करण्याचे आदेश पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेने दिले आहेत. परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आला आहे.

वाहतूक शाखेचे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी पत्राद्वारे सांगितले की, पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुक सुरक्षित व सुरळीतपणे होण्याकरीता यापूर्वीचे काही निर्बंध रद्द करण्यात आले असून दिघी आळंदी वाहतुक विभाग हद्दीतील प्रभाग क्रमांक 4 मधील गणेशनगर मुख्य रस्त्यावर वाहतुक कोंडी होत असल्याने बोपखेल मधील गणेशनगर येथील हनुमान मंदीर या मुख्य रस्त्यावर सम-विषम तारखेस पार्किंगबाबतचे तात्पुरत्या स्वरुपात आदेश देण्यात आले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

या बदलाबाबत नागरिकांच्या काही सूचना असल्यास त्या पोलीस उपआयुक्त, वाहतुक शाखा, पिंपरी-चिंचवड यांच्या कार्यालयात 5 सप्टेंबर 2020 ते 19 सप्टेंबर 2020 पर्यंत लेखी स्वरुपात कळवाव्यात, नागरिकांच्या सूचना व हरकतींचा विचार करुन अंतिम आदेश काढण्यात येणार आहे.

अग्निशमन, पोलीस आणि रुग्णवाहिका या अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.