Bopkhel : रिक्षा चालकाला लोखंडी रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज – रिक्षा चालकाला (Bopkhel) तिघांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि.23) रात्री बोपखेल येथे घडली आहे.
याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात योगेश वाल्मिकी, योगेश काकडा, दीपक वाल्मिकी (सर्व राहणार बोपखेल) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात लखन रामजीलाल नागोरिया (वय 28, रा. बोपखेल) यांनी फिर्याद दिली आहे.
Bhosari : कंपनीमधून साहित्य चोरणाऱ्या एकाला अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी केलेल्या मस्करीचा (Bopkhel) आरोपी यांना राग आला होता. याचाच राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीची रिक्षा अडवली व त्यांना लोखंडी रॉडने हातावर पायावर व डोक्यात मारून गंभीर जखमी केले.
यावरून भोसरी पोलिसांनी तिघा विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.